rasayani 
कोकण

दुभाजक ठरतोय अपघाताचे केंद्र

लक्ष्मण डुबे

रसायनी (रायगड) वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दितील  द्रुतगती महामार्गावरील रीस येथे दांड पेण रस्त्यावर पुलावर असलेल्या दुभाजकावर वाहन आदळुन अपघात वाढले आहे. आठ दिवसात दोन कार दुभाजकावर आदळुन अपघात झाले आहे. यात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. 

रसायनीतील या मुख्य रस्त्यावरून पाताळगंगा अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील, क्षेत्रा बाहेरील कारखाने तसेच रसायनी पाताळगंगा परीसरातील गावांतील वाहनांची कर्जत, पनवेल, नवीमुंबईकडे वर्दळ सुरू असते. जाताना हा दुभाजक वाहनांना धोकादायक ठरला आहे. रात्रीच्या वेळेस येथे अंधारामुळे दुभाजक दिसत नाही. त्यामुळे वाहन आदळुन अपघात होतात. यात वाहनांचे मोठे नुकसान होत आहे असे सांगण्यात आले. 

दरम्यान अपघातांना आळा घालण्यासाठी दुभाजकाच्या दोन्ही बाजुला रोटरी क्लब आँफ पाताळगंगाने  धोकादायक सुची लावल्या होत्या. साधारण तीन महिन्यापुर्वी धोकादायक सुची गायब झाल्या असल्याने पुन्हा अपघात वाढले आहे. तसेच या ठिकाणी यापुर्वी सुध्दा अपघात झाले आहे.  म्हणुन  सार्वजनिक बांधकाम विभागाने अपघात टाळण्यासाठी चांगली उपाययोजना  करावी आशी मागणी वाहन चालकांनी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT