कोकण

आंबोली धबधब्याजवळ कोसळला मोठा दगड

धबधब्यांवरील बंधारे काढावेत; आंबोलीतील ग्रामस्थ, वाहनचालकांची मागणी

सकाळ डिजिटल टीम

आंबोली : येथील (aamboli) मुख्य धबधब्याच्या ठिकाणी आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भला मोठा दगड कोसळला. पर्यटन (tourism) बंद असल्याने मोठी जीवितहानी टळली. याबाबतची अधिक माहिती अशी, येथील पोस्टमन सच्चिदानंद राऊळ घाटातून सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घरी जात होते. ते मुख्य धबधब्याजवळ (waterfall) आले असता त्यांच्या समोर ही घटना घडली.भलामोठा दगड रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला स्टॉलच्या अगदी समोर येऊन थांबला. सुदैवाने पर्यटन हंगाम सुरू नसल्याने आणि त्या वेळेस कोणतीही गाडी जात नसल्याने मोठी दर्घटना टळली.

वनविभागाने धबधब्यांवर बांधलेल्या बंधाऱ्यांमुळे अशा प्रकारचे दगड किंवा छोट्या-मोठ्या दरडी खाली येण्याचे प्रमाण वाढल्याची माहिती जाणकारांनी दिली. त्यामुळे धबधब्यांवरील बंधारे काढावेत, अशी मागणी आंबोलीतील ग्रामस्थ व वाहनचालकांतून होत आहे. याबाबत अनुभवी बांधकाम मजूर शिवा गावडे यांनी सांगितले होते की, हे बंधारे बांधल्याने धबधब्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळण्याची शक्यता आहे. आता अशा घटना घडत आहेत. काही वर्षांपूर्वी असाच एक भलामोठा दगड एका मोटारीवर येऊन कोसळला होता. सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती. आताही मोठा दगड पडला आहे.

येत्या मंगळवारी उपोषणाचा इशारा

सार्वजनिक बांधकाम विभाग सुशेगाद आहे. दोन वर्षे अधिकाऱ्यांनी काम केले नाही. त्यामुळे या घटनेने चाहूल दिली आहे. कामचुकार अधिकाऱ्यांविरोधात मंगळवारी (६) बांधकाम कार्यालयासमोर अनिल चव्हाण उपोषणाला बसणार आहेत. त्यांच्या आंदोलनास ग्रामपंचायतीचा पूर्ण पाठिंबा असल्याचे आंबोली सरपंच बाळा पालेकर यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Extortion Case : पोलीसच खंडणी वसूल करु लागले तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे जायचे? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिपण्णी

Nirmala Sitharaman Photo Fraud : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा फोटो पाहून तब्बल 43 लाख गमावले! महिलेच्या 'या' चुकीमुळे बँक खाते रिकामे, अशी झाली फसवणूक

Maharashtra Shetkari Karjmukti Yojana 2026: शेतकरी कर्जमाफीच्या GR मध्ये काय? फायदा-तोटा कुणाचा? सोप्या शब्दात गणित समजून घ्या...

'खलनायक'चा सिक्वेल येणार? ३३ वर्षांनंतर संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ पुन्हा एकत्र

"म्हणून नव्या दिग्दर्शकासोबत काम करायला आवडतं"- सई ताम्हणकर

SCROLL FOR NEXT