कोकण

ट्रकच्या धडकेत विजापूर येथील तरुण ठार 

सकाळ वृत्तसेवा

कणकवली  - नांदगाव (बोभाटेवाडी) येथे वळणावर समोरून येणाऱ्या ट्रकची मोटारसायकलला धडक बसली. यात मोटरसायकलस्वार ठार झाला. रामा संतू तांबे ( 21, रा  विजापूर) असे मृताचे नाव आहे. हा अपघात आज दुपारी एकच्या सुमारास नांदगाव फोंडा रस्त्यावर झाला. रामा हा विजापूर येथे मूळ गावी जत्रेला निघाला होता. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी राजापूर नाणार रिफायनरी प्रकल्पाजवळ सध्या काम सुरू असून विजापूर येथील काही कुटुंबे तेथे वास्तव्याला आहेत. या कुटुंबातील रामा तांबे व अन्य त्यांचे नातेवाईक मोटरसायकलने आज विजापूर येथे जात होते. राजापूर पडेल शिरगाव नांदगाव निपाणी रस्त्याने जात असताना त्यांच्याकडे तीन मोटरसायकल एक मोटार व अन्य काही वाहने होती. ही सगळी मंडळी विजापूर येथे मूळगावी 19 ऑगस्टला होणाऱ्या जत्रेसाठी जात होते.

नांदगाव तिठा सोडल्यानंतर तोंडवली (बोभाटेवाडी) येथील वळणावर निपाणीकडून शिरगावकडे जाणाऱ्या ट्रकची (के ए 25 23 84 ) रामा यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक बसली.  ही धडक इतकी भीषण होती की मोटरसायकल घसरत काही अंतर गेली. रामा ट्रकच्या मागील चाकामध्ये पाय अडकून गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळतात त्याचे नातेवाईकही घटनास्थळी दाखल झाले. जमलेल्या वाहनचालकांनी जखमी रामा याला उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अपघातातील ट्रक चालक महादेव शिवगोंडा खोत (39 रा निपाणी वाळकी ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निपाणी ते शिरगाव असेच चिरे वाहतूक करण्यासाठी हा ट्रक नांदगावच्या दिशेने जात होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुरात शतकाच्या उंबरठ्यावर, सीएसके गाठणार का 200 चा टप्पा

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT