accident in ratnagiri road one person dead in accident 
कोकण

ट्रकसोबत दुचाकी गेली फरफटत ; भीषण अपघातात एकजण जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा गावात बुधवारी रात्री झालेल्या ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात स्वाराचा मृत्यू झाला. राजेश महादेव धुमक (वय ३४, रा. झरेवाडी-रत्नागिरी) असे मृत स्वाराचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २७) घडली. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश धुमक व त्याची पत्नी ऋतुजा राजेश धुमक (वय ३०) व मुलगा साईश धुमक (वय ४) हे मुलाला दवाखान्यात उपचार करण्यासाठी रत्नागिरीत आले होते.

हातखंबा गावातील बस स्थानकाजवळ एक आरामबस उभी असताना मागून उतारावरून रत्नागिरीच्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने दुचाकीस्वाराला उडवले. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तिघेही फेकले गेले तर दुचाकी ट्रकसोबत सुमारे दोनशे मीटर फरपटत गेली होती. या अपघातात दुचाकीस्वार राजेश धुमक यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले.

हातखंबा गावातील समाजिक कार्यकर्ते मुन्ना देसाई व तरुणांनी मदतकार्य केले. जखमींना जगद्‌गुरु नरेंद्रचार्य महाराज मोफत रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर दोघांनाही पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात येत असताना पाली ते नाणीज दरम्यान प्रवासात मुलगा साईश धुमक यांचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली होता. संशयित ट्रकचालकावर गुन्हा दाखल करून अटक केली.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mutual Fund: पुढील 10 वर्षांत स्मॉल-कॅप, मिड-कॅप की लार्ज-कॅप, कोणता फंड सर्वाधिक परतावा देऊ शकतो?

India-Ukraine: भारताकडून येणाऱ्या डिझेलवर युक्रेन घालणार बंदी? रशियाच्या तेल खरेदीमुळे अनेक देशांनी केलं लक्ष्य

Pune Crime : युवकांकडून संघटित गुन्हेगारी घडवण्यात बंडू आंदेकरचा हातखंडा

Asia Cup 2025: UAE च्या विजयाने पाकिस्तानला दिलंय टेन्शन! सुपर फोरमध्ये कोण मिळवणास स्थान?

Banjara Morcha: बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंना विरोध; वंजारा-बंजारा एक असल्याच्या विधानाचा निषेध

SCROLL FOR NEXT