pali
pali 
कोकण

पालीतील ग्राहकांना विज देयकाच्या दंडाचा अतिरीक्त भार

अमित गवळे

पाली - विज महावितरण लेटलतीफ कारभाराचा त्रास पालीतील विज ग्राहकांना होत आहे. बहुतांश विज ग्राहकांना विज देयके हे नेहमी अंतिम देयक दिनांका नंतर येत आहेत. परिणामी वेळेत बिल घरी न आल्याने ग्राहकांना वारंवार हकनाक अतिरीक्त दंड भरावा लागत आहे. विजवितरण कार्यालयाकडून त्यांच्या तक्रारीची दखल देखील घेतली जात नाही.

विज वितरण कंपनीकडून देण्यात येणार्‍या विज देयकावर देयक दिनांक टाकण्यात येते. ही देयक दिनांक म्हणजे ज्यावेळी विज बिल सिस्टीम मध्ये तयार होते ती तारीख असते. साधारण या तारखेच्या दहा दिवसांमध्ये ग्राहकाच्या घरी विज बील येणे अपेक्षित असते. अंतिम देयक दिनांकापासून बिल भरण्याची अंतिम तारीख घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांसाठी वेगवेगळी असते. परंतु तो पर्यंत देखिल अनेक ग्राहकांकडे विज बील पोहोचत नसल्याने ग्राहकांना हकनाक दंडाची रक्कम भरावी लागते. दंडाची रक्कम विज देयकाच्या रकमेवरुन ठरते. दहा रुपयांपासून पुढे कित्येक रुपये दंड आकारला जातो. परिणामी विज बिल वितरक ठेकेदाराने घरी विज बील उशिरा आणल्याने कोणतीही चुकी नसतांना विज ग्राहकास दंडाचा भूर्दंड सोसावा लागत आहे. यामुळे विज वितरण कंपणीच्या घशात मात्र कित्येक रुपयांचा अतिरीक्त गल्ला जमा होतोय.

महावितरण कंपनीने विज देयके वितरीत करण्यासाठी ठेकेदारांची नेमणुक केली आहे. सध्या वीज महावितरणचे कर्मचारी देखील बिलांचे वाटप करत आहेत. अनेक वेळा या ठेकेदारांच्या हातात उशिरा बिले पडतात. तर काही वेळा देयके वाटण्यास उशिर झाल्याने ग्राहकांकडे विज देयके उशिरा पोहचते. तर काही वेळेला क्षेत्र मोठे असल्याने विज देयके वेळेत पोहचत नाहीत. बहुतांश ठिकाणी ठेकेदार उपलब्ध होत नसल्याने आहेत त्यांनाचा चालवून घ्यावे लागते. तर काही ग्राहकांची अशी तक्रार आहे की मुद्दामहून त्यांना उशिरा बिल दिले जाते. असे प्रकार वारंवार होत असल्याने ग्राहकांमध्ये विज वितरण कंपणीबाबत प्रचंड राग व असंतोष निर्माण झाला आहे.

वारंवार विज देयकाच्या अतिंम दिनांकानंतर देयक घरी येते. त्यामुळे विनाकारण अतिरिक्त दंड भरावा लागतो. मागील सहा महिन्यांपासून पाली विज वितरण कार्यालयाकडे लेखी पत्रव्यवहार करुन यासंदर्भात तक्रार नोंदविल्या आहेत. मात्र तक्रारीची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. तसेच वेळी अवेळ म्हणजे पहाटे साडेपाचच्या दरम्यान देखिल घरात विज देयक दिले जाते. त्यामूळे खुप मनस्ताप होतो. यावर वेळिच उपाययोजना होऊन अतिरिक्त दंडाची रक्कम परत करण्यात यावी.
- परेश गणेश चौधरी, विज ग्राहक, पाली

ग्राहकांच्या सोय़ीसाठी आता आमच्या कर्मचार्यांमार्फत विज देयके वाटत आहोत. केंद्रिय पद्धतीने विज बिलींग सुरु झाली आहे. प्रत्येकाच्या अतिंम दिनांक वेगवेगळ्या येतात. बिलाची पिडीएफ उशिरा आली तर बिल द्यायला उशीर होतो. विज देयके काही ठराविक ग्राहकांनाच वारंवार उशिरा जात असतील तर त्याची दखल घेतली जाईल. अशी तक्रार पुन्हा न येण्यासंदर्भात विज वाटप करणार्यांना देखिल सांगण्यात आले आहे.
- गोविंद बोईने, उपकार्यकारी अभियंता, वीज महावितरण कार्यालय - पाली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT