After Cyclone Jelly Fish Challenge Before Fisherman
After Cyclone Jelly Fish Challenge Before Fisherman  
कोकण

वादळापाठोपाठ आता मच्छीमारांपुढे याचे आव्हान 

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - वादळामुळे मच्छीमारी व्यवसायावर आलेले संकट टळत असतानाच मच्छीमारांपुढे जेली फिशचे आव्हान राहणार आहे. मिऱ्या, काळबादेवीसह काही किनारी भागात जेली फिश मासा आढळून आला आहे. हा मासा जाळी फाडत असल्याने मोठे नुकसान होते. आधीच मासळी नसल्याने मच्छी व्यावसायाला घरघर लागली असून त्यात नवीन संकट आ वासून उभे आहे. 

क्‍यार वादळाचा प्रभाव पूर्णतः ओसरला आहे. समुद्राचे पाणीही स्वच्छ झाले असून करंटही कमी आहे. गेले दोन दिवस मच्छीमार समुद्रात जाऊ लागले आहेत; परंतु त्यांना पाहिजे तशी मासळीच मिळत नसल्याने असमाधानी आहेत. ही परिस्थिती सुधारण्यासाठी तीन ते चार दिवस वाट पाहावी लागेल, अशी शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे.

जाळी फाटल्याने नुकसान

वादळानंतर मिऱ्या, काळबादेवीसह आजूबाजूच्या किनारी भागात जेली फिश मासा सापडत आहे. त्याचे प्रमाण कमी असले तरीही झुंडीने मासा जाळ्यात आला तर ते फाटून नुकसान होते. शनिवारी काही मच्छीमारांना जेली फिश दिसला होता. आधीच समुद्रात मासे कमी मिळत आहेत, त्या हा मासा आल्याने अन्य मासे मिळतील का हा प्रश्‍नच आहे. 

एका डिशला हा दर

मिरकरवाडा बंदरातील पंचवीस ते तीस नौका शनिवारी (ता. 9) मासेमारीसाठी समुद्रात गेल्या होत्या. त्यांच्या जाळ्यात 20 ते 25 डिश (32 किलोची एक डिश) पेडवा मासा मिळाला. हा मासा प्रक्रिया उद्योगाला दिला जातो. एका डिशला 700 ते 800 रुपये एवढाच दर कंपनीकडून दिला जातो.

गेल्या आठवड्यात रिपोर्टच मिळाला नसल्याने झालेला खर्च भरून कसा काढायचा असा प्रश्‍न मच्छीमारांपुढे आहे. ट्रॉलिंग, गिलनेटला 30 ते 40 किलो टायनी चिंगळे मिळाली. त्याला किलोला 65 ते 70 रुपये दर असल्याने त्यांनाही खर्च जास्त आणि मिळकत कमी अशी स्थिती आहे. त्याशिवाय सौंदाळा, दोडी, लेपा यांसारखी मासळी काही प्रमाणात मिळत आहे. त्यातून नौकेचा खर्चही निघत नसल्याने मच्छीमार अस्वस्थ आहेत. पर्ससिननेट नौकेला खलाशांच्या पगारासह आठवड्याला सव्वा दोन लाख रुपये खर्च आहे. फिशिंग, ट्रॉलिंगसाठीचा खर्च एक लाखापर्यंत जातो. सध्या मिळणारी मासळी पाहता खर्च अधिक आणि मासे कमी अशी अवस्था आहे. 

मासेमारीसाठी जात असलो, तरीही पाहिजे तेवढी मासळी आम्हाला मिळालेली नाही. समुद्रात जाण्या-येण्याचा खर्चही निघालेला नाही. पाणी निवळले आहे. चार दिवसांत मासे मिळतील अशी अपेक्षा आहे. 
- अभय लाकडे,
मच्छीमार. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...पुण्यात नेमकं काय घडलं?

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT