appendix surgery success on girl in chiplun 
कोकण

नातीच्या चेहऱ्यावर हास्य अन्‌ आजोबांना आनंदाश्रू 

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण - नातीच्या शास्त्रक्रियेसाठी गाठीला पैसे नसल्याने हतबल झालेल्या आजोबांच्या मदतीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश चव्हाण आणि सहकारी देवासारखे धावले. प्रयत्नांची पराकाष्ठा करत त्यांनी ती शस्त्रक्रिया यशस्वीही केली. या उपचारानंतर प्रेरणा शिंदे या मुलीच्या चेहऱ्यावरचे हास्य अन्‌ आजोबांच्या डोळ्यांतील आनंदाश्रू पाहून या मदतकर्त्यांचे डोळेही अलगद पाणावले. 

खेर्डी एमआयडीसी परिसरात राहणारे संतोष सावंत हे शहरातील पाग येथील कृष्णेश्वरनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये वॉचमन आहेत. 24 जूनला सोसायटीमधील राजेश चव्हाण आले असता त्यांना वॉचमन सावंत डोक्‍याला हात लावून बसलेले दिसले. चौकशी करताच त्यांनी आपल्या 9 वर्षाच्या प्रेरणा नीलेश चव्हाण या नातीच्या आजारपणाची माहिती दिली. प्रेरणा ही त्यांच्या मुलीची मुलगी. गेले 4-5 दिवस तिच्या पोटात अन्न जात नाही. खाल्ले की खूप दुखते. गेले 5 ते 6 महिने तसेच चालू आहे. चिपळुणातील खासगी डॉक्‍टरांनी अपेंडीक्‍स असून 30 हजार रुपये खर्च सांगितला. गेले चार महिने लोकडाऊन आहे. एवढा पैसा कुठून आणायचा या विवंचनेत ते असल्याचे चव्हाण यांच्या लक्षात आले. ऑपरेशनसाठी सरकारी योजनेचा आधार घ्यायचा असे चव्हाण यांनी ठरवले. त्यानंतर मदतीचा प्रवास सुरू झाला. पप्या चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत लाड, गुहागर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र पवार, पेडामकर, एक्‍सेल कंपनीचे एचआर मॅनेजर आनंद पाटणकर, विनती ऑर्गेनिक कंपनीचे प्रॉडक्‍ट मॅनेजर, बिपीन चिले यांसारख्यानी योगदान दिले. खासगी तीन ते चार रुग्णालयांमध्ये डॉक्‍टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला. योजनेमधून शस्त्रक्रिया करून देण्यासही संमती दर्शवली. योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्डवर तिचे नाव व रहिवासी दाखला नसल्याने अडचणी निर्माण झाल्या. राजेश चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न केले.

नायब तहसीलदार शेजाळ, मनोज पवार, प्रकाश पाथरूड यांनीही सहकार्य केले. प्रेरणावर चिपळुणातील एसएमएस हॉस्पिटलमध्ये डॉ. परमेश्वर गौड यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. आजारपणातील वेदनांना पूर्ण विराम मिळाल्याने तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आणि तिच्या आजोबांनीही हात जोडत सर्वांचे आभार मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA. 5th T20I: भारताने जिंकली मालिका! आधी हार्दिक-तिलकने चोपलं अन् मग चक्रवर्तीने फिरकीच्या जाळ्यात द. आफ्रिकेला अडकवलं

T20 World Cup साठी संघ निवडीच्या एक दिवस आधीच शुभमन गिल टीम इंडियातून बाहेर; BCCI ने दिले अपडेट्स

Car Loan: नवीन कार घेणार असाल तर खुशखबर! 'या' बँका देत आहेत कार कर्जावर सर्वात कमी व्याजदर, एकदा यादी पाहाच!

बनावट दारु विक्री! देशी-विदेशी दारू, हातभट्टी अन्‌ विविध विदेशी ब्रॅंडची बनावट टोपणे जप्त; सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांची कारवाई

Kidney Trafficking Racket: धक्कादायक! केवळ रोशन कुडेनेच नव्हे, तर आणखी चार युवकांनीही विकली किडनी

SCROLL FOR NEXT