Shri Ballaleshwar Ganpati Sakal
कोकण

Ganesh Jayanti : अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत भक्ति सागर लोटला; दर्शनासाठी लाखो भाविक दाखल

अष्टविनायक देवस्थानांपैकी एक पालीतील श्री बल्लाळेश्वराचा माघी मासोत्सव व श्री बल्लाळेश्वराचा जन्मोत्सव मंगळवारी (ता.13) मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

अमित गवळे

पाली - अष्टविनायक देवस्थानांपैकी एक पालीतील श्री बल्लाळेश्वराचा माघी मासोत्सव व श्री बल्लाळेश्वराचा जन्मोत्सव मंगळवारी (ता.13) मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी धार्मिक कार्यक्रम व विधी करण्यात आले. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांच्या लांब रांगा लागल्या होत्या. संपूर्ण परिसरात मोठी यात्रा भरली होती.

महाराष्ट्रासह देशभरातून आलेले भाविक बल्लाळेश्वराच्या चरणी लिन झाले. जन्मोत्सवाला बाळ गणेशाच्या मूर्तीला पाळण्यात टाकून भक्तिभावाने पाळणा हलविण्यात आले. यावेळी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे सरपंच (अध्यक्ष) जितेंद्र गद्रे, उपसरपंच (उपाध्यक्ष) वैभव आपटे, विश्‍वस्त प्रमोद पावगी, विश्‍वास गद्रे, अरुण गद्रे, अमोल साठे, डॉ. पिनाकिन कुंटे, माजी अध्यक्ष ऍड. धंनजय धारप आदी मान्यवर व भक्त उपस्थित होते. जन्म सोहळ्याच्या कीर्तनास व इतर कार्यक्रमात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक भक्त मंदिर परिसर व सजावटीच्या ठिकाणी फोटो व सेल्फी घेत होते.

माघी महोत्सवानिमित्त प्रशासन, नगरपंचायत व देवस्थान यांच्या समन्वयातून योग्य नियोजन करण्यात आले होते. तुकाराम दैठणकर (पुणे) यांचे सनईवादन, अभिषेक आणि श्रींचे जन्मोत्सव कीर्तन झाले. सायंकाळी श्रींचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीभावत निघाला, तसेच श्री बल्लाळेश्वराला महानैवेद्य ठेवण्यात आले.

तसेच वाहतूक सुरळीत रहावी व भाविकांना सुखरूप दर्शन व्हावे पोलीस तसेच देवस्थानचे सुरक्षारक्षक देखील तैनात करण्यात आले होते. परिवहन महामंडळाच्या बसेस पाली बाहेर थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे पाली स्थानकात बस आल्या नाहीत.

बच्चे कंपनीची मौज तर महिला वर्गाची खरेदीसाठी लगबग

यात्रेत मिठाई, खेळणी, गृहोपयोगी सामग्री व अन्य सजावटीचे साहित्य, उबदार कपड्यांची दुकाने लागली आहेत. त्यामुळे महिला वर्गांची खरेदारीची लगबग पाहायला मिळत आहे. या यात्रेत मनोरंजनासाठी विविध प्रकारचे पाळणे, आकाश पाळणे, मौत का कुआ आदी लोकांना आकर्षित करत आहेत. बच्चे कंपनी मौजमजा मस्ती करत होती.

'खाला' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या यात्रेतील विविध पाळण्याच्या मालकीण यांनी सांगितले की मी गेली २५ वर्ष पाली येथील माघी गणेशोत्सवाला यात्रेत लोकांच्या मनोरंजनासाठी विविध पाळणे घेऊन येत आहे. आजवर पालीत आल्यावर लोकांचे चांगल्या प्रकारे सहकार्य मिळत आहे. नफा-तोट्याचा कधी विचार केला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT