कोकण

धक्कादायक! आंबोलीत रानकुत्र्याच्या हल्ल्यात 13 जखमी; परिसरात घबराट

चार ते पाचजण गंभीर जखमी; 3 चिमुरड्यांचाही समावेश

भूषण आरोसकर

सावंतवाडी : गेळे व आंबोली येथील वस्तीत रानकुत्रा घुसून तब्बल 13 जणांना जखमी केल्याची घटना आज सकाळी आठच्या सुमारास घडली. जखमीमध्ये पुरुष महिला व लहान मुलांचाही समावेश आहे. या सर्वांना उपचारासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अचानक वन्य प्राण्याकडून झालेल्या हल्ल्याने आंबोली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाकडून नागरिकांनी वर्णन केल्यानुसार तो प्राणी रानकुत्रा असल्याचा खात्रीशीर अंदाज व्यक्त केला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आंबोली येथे काल रात्री गेळे जंगलमय भागातून रानकुत्रा गेळे आंबोलीतील वस्तीत घुसला. सकाळी 7 नंतर तो सतीचीवाडी येथून कामतवाडी, फौजदारवाडी, गावठाणवाडी, जाधववाडी येथील वस्तीत घुसला. त्याने लहान मुलांसह महिला व इतर नागरिकांवर हल्ला करुन जखमी केले. या हल्ल्यात तब्बल 13 जण जखमी असून 3 लहान मुलांचा समावेश आहे. तर एकूण जखमींपैकी चार ते पाचजण गंभीर जखमी आहेत.

घटनेची माहिती मिळताच आंबोली परिसरात वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव यांच्यासह वनमजुर बाळा गावडे, वनरक्षक बाळासाहेब ढेकरे, हेमंत बागुल, प्रताप कोळी, श्री गाडेकर अशी वन विभागाची टीम दाखल झाली आहे. बघितलेल्या नागरिकांकडून आधी बिबट्या असल्याचा समज झाला होता; मात्र खात्री झाल्यानंतर तो रानकुत्रा असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, वनविभागाने अद्यापही तो प्राणी पाहिला नाही. मात्र नागरिकांनी वर्णन केल्यानुसार तो रानकुत्रा असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्याला पकडण्यासाठी टीम घटनास्थळी हजर झाली आहे.

इतर नागरिकांना धोका निर्माण होऊ नये तसेच वनविभागाच्या मदतीसाठी कर्मचाऱ्यांसह नागरिकही हातात काठ्या घेऊन प्राणी वस्तीत पुन्हा येतो का हे पाहण्यासाठी लक्ष ठेवून आहेत. हल्ल्यात जखमींना सुरुवातीस आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी काहींना येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गंभीर जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganesh Visarjan 2025: विसर्जन मिरवणुकीने मोडला रेकॉर्ड, २९ तासांनंतरही सुरू, पोलिसांचे नियोजन कोलमडले

Latest Maharashtra News Live Updates: राजकीय पोळी भाजण्याची काम करणाऱ्या लोकांनी ओबीसी आणि मराठा लोकांचा वापर केला - शिवेंद्रराजे भोसले

Dark Web : एक क्लिक अन् सगळंकाही हॅक! काय आहे डार्क वेब? सुरक्षेसाठी 'हे' एकदा बघाच

'तू स्वतःला काय समजतेस?', बिग बॉस 19'मध्ये फरहाना भट्टवर सलमान खानचा संताप: म्हणाला 'मी तुम्हाला राग आणू का?'

Viral : जागा अपूरी पडली अन् चक्क पुलावर वसवले स्वप्नांतील शहर, जगभरातून पाहायला येतात लोक

SCROLL FOR NEXT