Auto Owner Honesty Tourist Bag Return : Sindudurg Marathi News
Auto Owner Honesty Tourist Bag Return : Sindudurg Marathi News 
कोकण

मालवणात रिक्षामालकाचा प्रामाणिकपणा 

सकाळ वृत्तसेवा

मालवण (सिंधुदूर्ग) : पर्यटनासाठी येथे आलेल्या पनवेल येथील महिला पर्यटकाची रिक्षात राहिलेली किंमती पर्स परत मिळवून देण्यात येथील पोलिसांना यश आले. सोमवारी (ता.23) रात्री उशिरा हडी येथून संबंधित रिक्षामालकानेही प्रामाणिकपणा दाखवत त्या महिला पर्यटकास पोलिसांच्या उपस्थितीत पर्स सुपूर्द केली. दिलावर शेख, असे रिक्षामालकाचे नाव आहे

पनवेल येथील नेहा जाधव, पूजा कांबळे या कुटुबीयांसह येथे पर्यटनासाठी आल्या होत्या. बंदर जेटी येथून एक रिक्षा पकडून त्या चिवला किनारी गेल्या. रिक्षातून घाईगडबडीत उतरताना पर्स घेण्यास विसरल्या. भाडे सोडून रिक्षामालक निघून गेला. काही वेळानंतर त्या महिला पर्यटकाला पर्स रिक्षातच राहिल्याचे कळले. त्यांनी तत्काळ पोलिस ठाणे गाठत याची माहिती दिली. या पर्समध्ये तीन तोळे सोने व रोख 19 हजार रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास करत सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता संबंधित रिक्षा ही हडी येथील असल्याची माहिती मिळाली.


 क्लिक करा - गुरुजींची नोकरी नऊ जणांनी का नाकारली ... ?

त्यामुळे रिक्षामालक दिलावर शेख याच्याशी पोलिसांनी संपर्क साधत याची माहिती दिलीरात्री उशिरा सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण, सुभाष शिवगण, विलास टेंबुलकर, माही महाडिक, महिला पोलिस कर्मचारी प्रवीणा आचरेकर यांनी हडी येथे त्या महिला पर्यटकांसोबत जात ती पर्स ताब्यात घेतली. रिक्षा मालकास रिक्षेतील पाठीमागील जागेत ठेवलेल्या या पर्सची कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे त्याने पाहणी करत महिला पर्यटकांची पर्स त्यांच्याकडे सुपूर्द केली.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT