Ayodhya Ram Mandir Rangoli esakal
कोकण

अशीही रामभक्ती! पाण्यावर तरंगत्या रांगोळीतून साकारला 'रामसेतू'चा देखावा; विलास रहाटेंचा अनोखा कलाविष्कार

तीन बाय दोन फूट आकाराची ही रांगोळी सध्या विद्यापीठात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

सकाळ डिजिटल टीम

साखरपा येथील रांगोळी (Rangoli) कलाकार विलास रहाटे यांनी आपल्या कलेतून अनोखी रामभक्ती साकारली आहे.

साखरपा : सध्या देशभरातील वातावरण राममय झाले असताना, साखरपा येथील रांगोळी (Rangoli) कलाकार विलास रहाटे यांनी आपल्या कलेतून अनोखी रामभक्ती साकारली आहे. पाण्यावर तरंगती रांगोळी काढत त्यांनी ही भक्ती साकारली आहे. विलास रहाटे हे देवरूख येथील रांगोळी कलाकार सध्या मुंबई येथे विद्यापीठाच्या (Mumbai University) कलासंघाचे युवा महोत्सवाचे मार्गदर्शक म्हणून काम पाहात आहेत.

येथील विद्यार्थ्यांना (Student) मार्गदर्शन करत असताना रहाटे यांना या रांगोळीची कल्पना सुचली. त्यांनी पाण्यावर तरंगती रांगोळी काढत त्यातून रामसेतूचा (Ayodhya Ram Mandir) देखावा साकारला आहे. तीन बाय दोन फूट आकाराची ही रांगोळी सध्या विद्यापीठात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या रांगोळीसाठी तीन ते चार तास लागल्याचे रहाटे यांनी सांगितले.

पाण्यावर रांगोळी साकारताना विशेष काळजी घ्यावी लागत असल्याचे ते म्हणाले. रांगोळी जास्त पडल्यास ती बुडण्याची शक्यता असल्याने रांगोळीचा वापर जपून करावा लागत असल्याचे ते म्हणतात. विद्यापीठात ही आकर्षक रांगोळी सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. रहाटे यांच्या आविष्काराची भुरळ नवोदित कलाकारांना पडत असून त्यांच्याकडे धडे घेण्यासाठी ते आकर्षित होऊ लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Circuit Bench : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी 75 एकर जागेचा मार्ग मोकळा! निवृत्त सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत कार्यक्रम; 16 ऑगस्टला होणार मोठी घोषणा?

लावणीच्या नावावर अश्लीलतेला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी घ्यावं लागेल प्रमाणपत्र, त्यानंतरच परवानगी; सरकारचा मोठा निर्णय

कार उलटल्यानंतर ट्रकला धडकली, चौघांचा जागीच मृत्यू; देवदर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, ५ जण गंभीर

Shravan Belpatra Rules: बेलाचं पान कधी तोडावं? कधी तोडू नये? 'या' चुकांमुळे लागू शकतो दोष; जाणून घ्या योग्य नियम

Independence Day Live Update : बावनकुळेंचे स्वातंत्र्यदिनी विकसित महाराष्ट्राचे आवाहन

SCROLL FOR NEXT