bal mane criticized on the statement of uday samant in ratnagiri 
कोकण

'मला शिवसेनेत बोलवून सामंत भाजपमध्ये जाणार ?'

मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : मंत्री उदय सामंत मला शिवसेनेत बोलवत आहेत, परंतु सामंत यांना पक्ष बदलण्याची सवय आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेतून भाजपमध्ये उडी मारण्याची संधी सामंत यांना आली असावी, म्हणूनच ते मला शिवसेनेत बोलवत आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. सामंत यांनी 'आहात त्या घरात सुखाने नांदा', असला पोरकटपणा करू नका, असे प्रत्युत्तर माजी आमदार बाळ माने यांनी सामंत यांना दिले.

गोळपमध्ये ग्रा. पं. निवडणूक प्रचारसभेत सामंत यांनी माने यांना शिवसेनेत येण्याचे निमंत्रण दिले होते. परंतु ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात मग्न असल्याने माने यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. ग्रामीण भागामध्ये विद्यमान सामंत यांच्याबद्दल मूळ व प्रामाणिक निष्ठांवत शिवसैनिकांमध्ये अन्याय होत असल्याची भावना असल्याने त्याचा उद्रेक होत आहे. निवडणुकीत निष्ठावंत शिवसैनिक बाळ माने यांच्यासोबत जातील, अशी भीती वाटल्यामुळे संभ्रम निर्माण करण्याकरिता सामंत यांनी वरील विधान करून एक केविलवाणा प्रयत्न केल्याचा टोला माने यांनी हाणला.

2014 मध्ये युतीमधून मी निवडून येणार असल्याचे कळल्यानंतर राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म घेऊन दगाफटका करून सामंतांनी भाजपशी संधान बांधले. पण देवेंद्र फडणवीस यांनी पक्षात या, पण निष्ठावंत माने यांनाच उमेदवारी देणार हे जाहीर केल्यामुळे सामंत यांनी सेनेत प्रवेश केला. नाटकात कलावंत पेहराव बदलतो तसा भगवा पेहराव सामंतांनी केल्याचा इतिहास लोकांना माहिती असल्याचे माने यांनी सांगितले. 

2019 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यासाठी आयुष्यात प्रथमच सामंत यांचा प्रचार केला. सामंत राष्ट्रवादीत असल्याने सातत्याने युतीसोबत संघर्ष होत होता. हातखंब्यात डॉ. सुजय लेले यांना मारहाण झाल्यावेळी त्यांच्या संरक्षणासाठी आम्ही मारामारीसुद्धा केली. राष्ट्रवादीने ज्या ज्या वेळी भाजप कार्यकर्त्यावर अन्याय केला त्यावेळी मारामारीच काय अन्य काही करायला तयार असतो, असे सांगून माने यांनी आजही आपण आक्रमक असल्याचे सांगितले.

सामंतांचे सल्लागार पवार आणि राऊत

सामंत यांना मी कसलाही सल्ला दिला नाही. 2019 च्या निवडणुकीत दोन महिने भाजप वरिष्ठांनी सांगितल्यामुळे विजयासाठी काही सल्ला, सूचना दिल्या असतील. परंतु सामंत यांचे सल्लागार हे शरद पवार, विनायक राऊत आहेत. माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता सल्लागार नसल्याचे माने यांनी स्पष्टपणे सांगितले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT