Ballaleshwar Temple Road  esakal
कोकण

Ballaleshwar Temple : अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत रोगापेक्षा उपाय भयंकर! रस्त्यावर खडी टाकल्यामुळे अनेक बाईकस्वार घसरून जखमी

अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली येथील श्री बल्लाळेश्वर मंदिराकडे (Ballaleshwar Temple) जाणाऱ्या रस्त्याची दूरवस्था झाली आहे.

अमित गवळे : सकाळ वृत्तसेवा

बल्लाळेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. यामुळे भाविक, पर्यटकांना तसेच लहान मुले, वयस्कर लोकांना येथून मार्ग काढताना खूप त्रास सहन करावा लागत आहे.

पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली येथील श्री बल्लाळेश्वर मंदिराकडे (Ballaleshwar Temple) जाणाऱ्या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पाली नगरपंचायततर्फे (Pali Nagar Panchayat) या ठिकाणी तात्पुरती उपाययोजना म्हणून खडी टाकण्यात आली आहे. मात्र, या खडीवरून घसरून आतापर्यंत चार ते पाच बाईकस्वार जखमी झाले आहेत. शनिवारी (ता. 13) रात्री या ठिकाणी चार बाईकस्वार तर, रविवारी (ता. 14) एक बाईकस्वार घसरून कोसळले व जखमी झाले आहेत.

रस्त्यावर टाकण्यात आलेल्या या खडीमुळे दुचाकीस्वारांचे चाक घसरत आहे. आणि तोल जाऊन ते खाली कोसळत आहेत. तसेच पादचाऱ्यांना देखील येथून मार्ग काढताना अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच या खडीमध्ये आणखी पाणी साचून राहते. आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

हा रस्ता खूप खराब झाला आहे. येथून मार्ग काढणे गैरसोईचे होते. त्यातच आता टाकलेल्या खडीवरून घसरून अनेक बाईकस्वार जखमी झाले आहेत. हा रस्ता योग्य प्रकारे सुस्थितीत करणे गरजेचे आहे, असे पालीतील ग्रामस्थ महेश गोळे यांनी सांगितले.

श्री बल्लाळेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. यामुळे भाविक, पर्यटकांना तसेच लहान मुले, वयस्कर लोकांना येथून मार्ग काढताना खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच या खड्ड्यांवर उपाय म्हणून नगरपंचायततर्फे येथे खडी टाकण्यात आली आहे. आणि हा रस्ता आता अधिक धोकादायक झाला आहे. या खडीमुळे रोगापेक्षा उपाय भयंकर झाला आहे. येथील नागरिक, बाईकस्वार व भाविकांना याचा खूप त्रास होत आहे. या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात खडी टाकण्याऐवजी ठोस उपाययोजना करण्याची गरज होती.

-सुशील शिंदे, भाजप शहराध्यक्ष, पाली

पालीतील इतर सर्व मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण झाले आहे. तसेच अनेक ठिकाणचे रुंदीकरण करण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणचा रस्ता काही तांत्रिक कारणामुळे प्रलंबित राहिला आहे. अन्यथा, हा रस्ता देखील सुस्थितीत झाला असता. पावसाळ्यात भाविक व नागरिकांना खड्ड्यांचा त्रास होऊ नये यासाठी उपाययोजना म्हणून या ठिकाणी ग्रिट व खडी टाकण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना काही त्रास होत असेल तर ती अतिरिक्त ग्रिट व खडी बाजूला काढण्यात येईल.

-प्रणाली शेळके, नगराध्यक्षा, पाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

SCROLL FOR NEXT