Wine Seized Sakal
कोकण

गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात बांदा पोलिसांची कारवाई

गोव्यातून सरमळे येथे केल्या जाणार्‍या गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात बांदा पोलिसांनी कारवाई केली.

निलेश मोरजकर

बांदा - गोव्यातून सरमळे येथे केल्या जाणार्‍या गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात बांदा पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ८१ हजार रूपयांच्या दारूसह एकूण दोन लाख ५१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी डिट्टो तंगचद (रा. एर्नाकुलम केरळ, सध्या रा. सरमळे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरलेली जीप (केएल ०१ के २९९०) ताब्यात घेण्यात आली. बांदा पत्रादेवी सीमेवरील दत्तमंदिर येथे बुधवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातून महाराष्ट्रात केल्या जाणार्‍या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात बांदा पोलीस सीमेवर नजर ठेवून आहेत. बुधवारी मध्यरात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास पत्रादेवी दत्तमंदिरकडे बांद्याकडे येणारी जीप तपासणीसाठी थांबवण्यात आली. तपासणीदरम्यान जिप मध्ये वरच्या बाजूस चोरकप्पा बनविल्याचे निदर्शनास आले. या चोरकप्प्यात मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या भरण्यात आल्या होत्या. पोलिसांनी दारुसह मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा पोलीस शिपाई प्रथमेश पवार यांनी केली. अधिक तपास बांदा पोलीस करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

Chhatrapati Sambhajnagar: दिवसभर उकाडा; सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी; विजांच्या कडकडाटासह शहरभर पावसाचे आगमन

Shaktipith Highway Kolhapur : शक्तिपीठ महामार्गाचा नकाशा बदलला, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, शिरोळ, हातकणंगले वगळले

Pune Rain News: पुण्याला गारांच्या पावसाचा तडाखा; मध्यवर्ती भागासह उपनगरांत नागरिकांची तारांबळ, झाडपडीच्‍या आठ घटना!

Chhatrapati Sambhajinagar: त्याने भरले बेरंगी आयुष्यात रंग!; ऑटिझमवर मात करीत स्वराज राजपूत बनला आईचा आधार

SCROLL FOR NEXT