कोकण

वेंगुर्ल्यात बांगड्याचा बंपर सेल ; माशांच्या वजनाने होड्याही रुतल्या

समुद्रामध्ये एकाच वेळी नौका निघतात आणि मासेमारी करून त्या रात्री उशिरा किनाऱ्यावर येतात.

सकाळ वृत्तसेवा

वेंगुर्ले : येथील नवाबाग समुद्रात बांगडा माशाचा बंपर मच्छीमारांच्या हाती लागला. तो पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी मत्स्य खवय्यांची एकच गर्दी उसळली. यामुळे खवय्यांची चांदी झाली तरी तेवढ्या प्रमाणात बर्फ न मिळाल्याने कवडीमोल किमतीने मच्छीमारांना या माशांची विक्री करावी लागली.नवाबाग किनाऱ्यावरून मासे पकडण्यासाठी दररोज सायंकाळी समुद्रामध्ये एकाच वेळी नौका निघतात आणि मासेमारी करून त्या रात्री उशिरा किनाऱ्यावर येतात. सध्या मासेमारी हंगाम जोमात सुरू आहे; मात्र पाहिजे त्या प्रमाणात मासळी मिळत नव्हती. काल रात्री उशिरा मासेमारी करून नौका किनाऱ्यावर दाखल झाल्या. सगळ्याच नौकांना मोठ्या प्रमाणात बांगडा मासा मिळाला. काही नौकांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त मासा असल्याने यातील दोन नौका किनाऱ्यावरच रुतल्या. मच्‍छीमार बांधवांनी त्या नौका शिताफीने बाहेर काढल्या.

नौका किनाऱ्यावर आल्यानंतर जाळ्यातून मासळी बाहेर काढावी लागते. काही जाळ्यांमधील मासळी काढण्याचे काम आज सकाळपर्यंत सुरू होते. बांगड्याचा बंपर लागल्याचे समजताच स्थानिकांनी किनाऱ्याकडे धाव घेतली. बांगडा जास्त असल्याने याच्या विक्रीचा प्रश्न निर्माण झाला. मच्छीमारांनी तो साठवण्यासाठी बर्फ शोधायला सुरूवात केली; मात्र पुरेशा प्रमाणात बर्फ नसल्याने अल्प किमतीत मासळी विकावी लागली. यामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले. कमी किमतीत मासे मिळाल्याने मत्स्य खवय्यांची मात्र चांदी झाली.

गेल्या दोन वर्षांत सतत समुद्रात तुफान आल्याने मासे किनाऱ्याकडे येण्यास अडथळे होते. मात्र, आता वातावरण शांत झाल्याने मासे पुन्हा किनाऱ्याकडे येण्यास पूरक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बांगडा मिळाला. मुबलक बर्फ नसल्याने अतिशय कमी दरात तो विकावा लागला. मोठ्या प्रमाणात मासे होडीत असल्याने काही होड्यांचे वजन वाढले. हा सर्व मासा काही प्रमाणात विक्री, तर उर्वरित फिश मिल कंपनीला देण्यात आला.

- वसंत तांडेल, मच्छीमार नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT