Bhaskar Jadhav selected as Shiv Sena spokesperson political marathi news 
कोकण

शिवसेनेच्या प्रवक्तेपदी भास्कर जाधव यांची निवड 

मुझफ्फर खान

चिपळूण (रत्नागिरी) :  गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे आमदार जाधव आता शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात आले आहेत. 
कोकणातील शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून यापूर्वी उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांची निवड करण्यात आली होती. मात्र मातोश्रीवरून नुकतेच 16 प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये उदय सामंत यांच्याएैवजी भास्कर जाधव यांचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबईत नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशन झाले. त्यात भाजपच्या नेत्यांनी सचिन वझे, विदर्भ - मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरण आणि अंबानीच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणावरून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे वरिष्ठ मंत्री आणि प्रवक्ते सभागृहात उपस्थित असताना कोणीही भाजप विरोधी आक्रमक भूमिका घेतली नाही. मात्र भास्कर जाधव यांच्याकडे शिवसेनेचे कोणतेही महत्त्वाचे पद नसताना त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजीमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांना अंगावर घेतले. त्यांच्या या आक्रमकपणाची राज्यभर चर्चा झालीच. शिवाय सभागृहातही महाविकास आघाडीला बळ मिळाले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी सभागृह संपल्यानंतर भास्कर जाधवांचे विशेष अभिनंदन केले.

महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्यामुळे भास्कर जाधव सक्रीय राजकारणातून बाजूला फेकले गेले अशी चर्चा सुरू होती. मात्र सभागृहात विरोधी पक्षाला आक्रमकपणे उत्तर देवून शिवसेनेला अडचणीच्या काळात सावरण्याचे काम भास्कर जाधव यांनी केले त्याबदल्यात पक्षाकडून त्यांची प्रवक्तेपदी निवड करण्यता आली. पदासाठी कोणतेही लॉबींग न करता आपल्या कर्तृत्वाच्या बळावर आमदार जाधव यांनी हे पद पक्षाकडून मिळवले.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्डरेकॉर्ड

Virar News : मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे संदर्भात जपान आंतरराष्ट्रीय संस्था JICA यांची वसई-विरार शहर महानगरपालिकेला भेट

Latest Marathi News Live Update : गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाचा भाजीपाला, फळबागांना फटका

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी त्यांची खाती इतर मंत्र्यांकडे सोपवली; मोठं कारण आलं समोर, पडद्यामागे नेमकं काय घडलं?

IND vs SA: अरे बॉल दे ना... ! अहमदाबादमध्ये द. आफ्रिकेचा खेळाडू चाहत्यांवर भडकला; Video Viral

SCROLL FOR NEXT