bicycle day activity is organized in dapoli valentine day special news marathi 
कोकण

‘व्हॅलेंटाइन डे’ला करा सायकलवरच प्रेम; दापोलीकरांची साद

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ (रत्नागिरी) : सायकल चालवण्यामुळे आपले आरोग्य तंदुरुस्त राहते. तसेच इंधन न वापरले गेल्यामुळे आपले पैसे वाचतात आणि प्रदूषणसुद्धा कमी होते, पर्यावरण जपले जाते. असे सायकलचे अनेक फायदे असल्यामुळे दापोलीकर आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करत आहेत. सायकलप्रती असलेले आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि सर्वांनी सायकल चालवून आरोग्य जपावे, या जनजागृतीसाठी दापोलीकरांकडून रविवारी (ता. १४) सायकल फेरी काढण्यात येणार आहे. सायकलवर प्रेम करा, हा संदेश देण्यासाठी दापोलीकर व्हॅलेंटाइन डे निमित्ताने रविवारी (ता. १४) सायकल फेरी काढणार आहेत. त्यात ‘हळू सायकल’ स्पर्धेचेही आयोजन केले आहे.

ही सायकल फेरी दापोली शहरातील आझाद मैदान-वडाचा कोंड-जालगाव ग्रामपंचायत-जालगाव बाजारपेठ- गव्हे-आझाद मैदान या मार्गावर आयोजित केली गेली आहे. सायकल फेरीचे अंतर ८ किमी असून त्यासाठी सकाळी ७.३० वा. आझाद मैदानात जमायचे आहे. तेथे सायकल फेरी मार्गाबद्दल सूचना देण्यात येतील आणि सायकल फेरीला सुरवात होईल. सायकल फेरीमध्ये सायकल सावकाश, कमी वेगाने चालवल्या जातील. यामध्ये दापोलीकरांनी आपल्या मुलांना आणि नातवंडांना घेऊन सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

सायकल फेरीसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही; मात्र मास्क लावणे गरजेचे आहे. सायकल फेरी झाल्यावर ९ वाजता आझाद मैदानात १०० मीटर अंतराची हळू सायकल स्पर्धा लहान वयोगट व खुला गट अशा दोन गटात घेण्यात येणार आहे.  दरवर्षी १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे हा प्रेम दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. भारतात पूर्वीपासून रक्षाबंधन, पाडवा, भाऊबीज, मकर संक्रांत, वटपौर्णिमा, ईद असे अनेक सण साजरे केले जातात. 


दापोलीमध्येही सगळे सण आनंदाने साजरे होतात. दिवसेंदिवस वाढत जाणारे प्रदूषण, त्यापासून शरीरासोबत पर्यावरणाचे नुकसान होऊ नये याबद्दलही नागरिकांनी अधिक जागरूक व्हावे, पर्यावरण रक्षणात आपले योगदान द्यावे, आरोग्य तंदुरुस्त राखावे, यासाठी हा उपक्रम आयोजित केला आहे.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाकरे बंधुंच्या युतीचा मुहूर्त ठरला? 'या' तारखेला अधिकृत घोषणा होण्याची शक्यता, राज ठाकरे-संजय राऊतांच्या बैठकीत काय झाली चर्चा?

मुलाला वाचवायला रक्ताचे नमुने बदलले, बाप दीड वर्षांपासून तुरुंगात; पोर्शे अपघात प्रकरणी हायकोर्टानं जामीन फेटाळला

IPL 2026 Auction live : CSK ने स्वतःच्याच खेळाडूला 'परकं' केलं! MS DHONI चा विश्वासू गोलंदाज १८ कोटींत KKR च्या ताफ्यात

Credit Card : या सोप्या सवयी लक्षात ठेवल्या, तर क्रेडिट कार्ड देईल तुम्हाला मोठा फायदा! फायदा हवा? हे एकदा नक्की पाहा!

IPL 2026 Auction live : मुंबई इंडियन्सची स्वस्तात मस्त डील! रोहित शर्माला तगडा ओपनिंग पार्टनर मिळाला, झाली घरवापसी; चिंता मिटली

SCROLL FOR NEXT