Cabinet expansion Deepak Kesarkar esakal
कोकण

Deepak Kesarkar : '..तर दीपक केसरकर भाजपमध्ये जातील'; ठाकरे गटाच्या प्रवक्त्याचा मोठा गौप्यस्फोट

केसरकर आता अजित पवारांच्या (Ajit Pawar) मागे धावताना दिसले. हा प्रकार म्हणजे लाचारी नाही का?

सकाळ डिजिटल टीम

शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे आयत्यावेळी असे झाल्यास केसरकरांकडे असलेले मंत्रिपद राहील का? हा प्रश्न आहे.

सावंतवाडी : राज्यात मंत्रिमंडळ विस्तारावरून (Cabinet Expansion) गदारोळ सुरू आहे. या धामधुमीत शिवसेनेतून (Shiv Sena) बंडखोरी करून शिंदे गटात गेलेल्या आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांचे मंत्रिपद टिकेल, की ते आता भाजपमध्ये जातील, असा प्रश्न ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात निधी देताना अन्याय केला, असे सांगणारे केसरकर आता अजित पवारांच्या (Ajit Pawar) मागे धावताना दिसले. हा प्रकार म्हणजे लाचारी नाही का? की ते जनतेची दिशाभूल करीत आहेत?, असा प्रश्नही त्यांनी (Dr. Jayendra Parulekar) केला आहे.

याबाबत डॉ. परुळेकर यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे. त्यात म्हटले आहे, की राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू आहेत. आता विस्तार करताना शिंदे गटातील मंत्र्यांना बाजूला करून त्या ठिकाणी अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांना मंत्रिपदे द्यावीत, असा विचार सुरू आहे.

त्यावरून शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे आयत्यावेळी असे झाल्यास केसरकरांकडे असलेले मंत्रिपद राहील का? हा प्रश्न आहे. दुसरीकडे रवींद्र चव्हाण यांच्याकडे दोन पालकमंत्री पदे आहेत. त्यामुळे त्यांना अन्य ठिकाणची जबाबदारी दिल्यास जिल्ह्याला नवा पालकमंत्री मिळेल का, असाही प्रश्न त्यांनी केला आहे.

दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या नाट्याबाबत त्यांनी डॉ. परुळेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा सर्व प्रकार म्हणजे सर्कस असल्याचे त्यांचे म्हणणे असून हा ‘हायजॅक ड्रामा’ जास्त काळ चालणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT