bjp shivsena politics issue umbarde konkan sindhudurg
bjp shivsena politics issue umbarde konkan sindhudurg 
कोकण

उंबर्डेत भाजपला एकच धक्का, कार्यकर्ते शिवसेनेत

एकनाथ पवार

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - उंबर्डे मेहबूबनगर येथील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी भाजपाला रामराम करीत शिवसेनेत प्रवेश केला. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवसेना नेते सतीश सावंत यांनी प्रवेशकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत करतानाच त्यांना विकास प्रकियेत सामील होण्याचे आवाहन केले. 

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीने प्रेरित होऊन जावेद पाटणकर, गौस पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पतसंस्थेचे अध्यक्ष गौस पाटणकर, नौशाद नाचरे, शहाबुद्दीन बोबडे, अमीन लांजेकर, नूरमहंमद बोथरे, मुराद पाटणकर, आदाम पाटणकर, गौस लांजेकर, महंमदहनिफ रमदुल, अब्दुल बोबडे, महंमदअली पाटणकर, अकबर रमदुल, मुश्‍ताक रमदुल आदींनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. 

यावेळी उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुका प्रमुख मंगेश लोके, युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी, रमेश तावडे, सुरेश पांचाळ, माजी नगराध्यक्ष रविंद्र रावराणे, संजय चव्हाण, माजी नगरसेवक संतोष पवार, दीपक गजोबार, बंड्या सावंत, विठोजी पाटील, जितेंद्र तळेकर आदी उपस्थित होते. मुस्लिम कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशसाठी युवासेनेचे जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी यांनी विशेष मेहनत घेऊन एकसंघ असलेल्या उंबर्डे महेबूबनगरमध्ये सुरुंग लावत भाजपला खिंडार पाडले आहे. भाजपसाठी जोरदार धक्का मानला जात आहे. 

यावेळी सावंत म्हणाले, ""राज्यातील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाविकास आघाडी सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. हे सरकार लोकाभिमुख काम करीत असून सर्व जाती धर्मासाठी समांतर कार्यक्रम राबवित आहे. ज्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना पक्षात सन्मानाची वागणूक दिली जाईल. रस्ते, पाणी, वीज यांसह विविध पायाभूत कामे सरकारच्या माध्यमातून होत राहतील; परंतु येथील प्रत्येक कुटुंब सुखी समाधानी होईल यासाठी सर्वांनी एकत्रित काम करूया.'' 

दबाव, धमक्‍यांना घाबरू नका 
उंबर्डे मेहबूबनगर येथील मुस्लिम समाजातील लोकांनी ज्या विश्‍वासाने शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्या विश्‍वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. येथील नागरिकांचे प्रश्न आणि विकास कामे प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन. इथून पुढे कोणत्याही प्रकारचा दबाव अथवा धमक्‍यांना घाबरू नका. माझ्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असा विश्वास त्यांनी दिला.  

 संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT