Blood cancer suffers bhagyshri death in banda kokan marathi news 
कोकण

'तिला' द्यायचा होता कुटुंबाला आधार ; मात्र अखेर तिला मृत्यूने गाठले

सकाळ वृत्तसेवा

बांदा (सिंधुदूर्ग)  : ब्लड कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या भाग्यश्री संजय सातोस्कर (वय २६, रा. बांदा-काळसेवाडी) या युवतीची मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज संपली.गोवा-मणिपाल रुग्णालयात उपचार सुरू असताना आज सकाळी साडेआठ वाजता तिची प्राणज्योत मालविली. गेले ४ महिने तिच्यावर उपचार सुरू होते. आई-वडील व दोन लहान बहिणींची जबाबदारी खांद्यावर असलेल्या भाग्यश्रीच्या निधनाने अवघ्या बांदा शहरावर शोककळा पसरली आहे.

कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी भाग्यश्री ही शहरातील दुकानात काम करत होती. ऑक्‍टोबर २०१९ मध्ये तिला ब्लड कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रासल्याचे निदान झाले होते. मुळातच हलाखीची परिस्थिती असल्याने उपचारासाठी १० लाख रुपये खर्च हा सातोस्कर कुटुंबियांसाठी न पेलविणारा होता. यासाठी बांदावासीयांनी एकजूट दाखवत या भगिनीसाठी पैसे उभे करण्याचा निर्णय घेतला होता.

सोशल मीडियावरुन मदत

सोशल मीडियावर ‘हेल्प अवर भाग्यश्री, फाईट ब्लड कॅन्सर’ या शीर्षकाखाली मदतीचे कॅम्पेनिंग करण्यात आले. अवघ्या दोन दिवसांत या भगिनीसाठी ५ लाख रुपयांहून अधिक रक्कम गोळा झाली होती. दात्यांकडून मदतीचा ओघ अद्यापपर्यंत सुरू होता. तिच्यावर गोवा-मणीपाल रुग्णालयात उपचार सुरू होते. मध्यंतरी उपचारांना ती प्रतिसादही देत होती; मात्र ४ दिवसांत तिची प्रकृती खालावली. उपचारांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आज सकाळी तिचे निधन झाले.  

आज सायंकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार
शोकाकुल वातावरणात आज सायंकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या अंत्यदर्शनासाठी बांदावासीयांनी व सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी साश्रुनयनांनी तिला निरोप देण्यात आला. तिच्या मागे आई-वडील, दोन बहिणी, काका असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT