Blue light is produced by a chemical process in ocean waves Expert explanation  
कोकण

समुद्राच्या लाटामध्ये रासायनिक प्रक्रियेतून तयार होतो निळा प्रकाश; तज्ज्ञांचे स्पष्टीकरण 

राजेश कळंबटे

रत्नागिरी - तालुक्‍यातील किनाऱ्यांवर रात्रीच्यावेळी दिसणाऱ्या निळ्याशार लाटा पर्यटकांना भुरळ घालत आहेत. लाटांवर पेटल्यासारखा चमकणारा हा प्राणी डोळ्यांनी दिसू शकतो; मात्र मायक्रोस्कोपमधून त्याला पाहिले तर त्याची रचना बदामासारखी दिसते. त्यांच्या शरीरात लुसिफेरेन हे प्रथिन आणि लुसिफेरेज हे एंझाईम प्राणवायूच्या सान्निध्यात आल्यानंतर रासायनिक प्रक्रिया होते आणि जी ऊर्जा निर्माण होते, त्यामधून प्लवंगामध्ये प्रकाश दिसू लागतो, असे सागरी जीव अभ्यासक डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी सांगितले. 

रत्नागिरी शहरातील भाट्येसह आरे-वारे, रिळ, वरवडे येथील किनाऱ्यांवर रात्री निळ्याशार लाटा पाहायला मिळत आहेत. याबाबत रत्नागिरीतील सचिन देसाई यांनी चार वर्षांपूर्वीपासून पाठपुरावा केला होता. यावर डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी सविस्तर अभ्यास केला. त्यामधून अनेक नवीन माहिती पुढे आली आहे. लाटांवरील तो प्रकाश कसा निर्माण होतो याची माहिती डॉ. मोहिते यांनी सांगितली. Noctiluca scintilans हे शास्त्रीय नाव असलेले हे एकपेशीय डायनोफ्लाजेलेट प्राणी प्लवंग सध्या मोठ्या प्रमाणात रत्नागिरी आणि गोव्याच्या किनाऱ्यांवर दिसून येत आहेत.

2 मिमीपर्यंत व्यास असलेले हे प्राणी नुसत्या डोळ्यांनी दिसू शकतात पण मायक्रोस्कोपमधून त्यांची आगळीवेगळी रचना तेवढीच आकर्षक आहे. काहीसे बदामाचा आकार असलेले हे प्राणी एकपेशीय प्लवंगातील मोठे सजीव आहेत. त्यांच्या शरीरावर जिलेटिनसारखे पारदर्शक आवरण असते. हलके शरीर असल्यामुळे ते पाण्यावर आरामात तरंगू शकतात. प्लवंगाला सुलभ हालचाल करण्यासाठी 2 फ्लाजेला म्हणजे शेपट्या असतात. त्याचा उपयोग सूक्ष्म भक्ष्य पकडण्यासाठीही होतो. त्यांच्या शरीरात लुसिफेरेन हे प्रथिनं आणि लुसिफेरेज हे एंझाईम यांच्यात प्राणवायूच्या सान्निध्यात रासायनिक प्रक्रिया होऊन जी ऊर्जा निर्माण होते ती प्रकाशाच्या स्वरूपात. तोच हा जैविक प्रकाश . हे प्राणी उद्दीपित होतात तेव्हा हा प्रकाश निर्माण होतो. त्यांच्या शरीरात सिंटीलांस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूजक्‍यांमध्ये ही क्रिया घडते. 

या noctiluca ने आपल्या शरीरात पेडिनोमोनज नोकटीलुके या शैवाल वर्गीय सजीवांना आसरा दिला आहे. त्यामुळे ते हिरवे दिसतात. हे सजीव noctiluca साठी प्रकाशसंश्‍लेषण करून अन्ननिर्मिती करतात. मायक्रोस्कोपमधून या प्राण्याचं एक वेगळच जग दिसते, असे डॉ. मोहिते यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Recruitment : एमपीएससीच्या कारभारावर आक्षेपांचा पाऊस ; नागपूर विभागातून सर्वाधिक ७, ६०० ई-मेल ; व्ही. राधा यांची माहिती

Asian Games Nagoya : भारतीय खेळाडूंच्या आगमनात अडथळे ; आशियाई क्रीडा स्पर्धा ; खेळाडूंना क्रुझवरील रूम्स मिळण्यासाठी कसरत

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर मोठा प्रकल्प; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडसाठी ३,७२२ कोटींच्या भूसंपादनाला मंजुरी

पतीसोबत वादात मदतीच्या बहाण्याने भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाचा २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार; भिवंडीत दोघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवून गैरकृत्य

SCROLL FOR NEXT