body of the missing person was found in Talwade 
कोकण

सावंतवाडी ; तळवडेतील बेपत्ताचा मृतदेह नेमळेत आढळला

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी - कोकण रेल्वे मार्गावर नेमळे येथे रेल्वे ट्रॅकवर शुक्रवारी आढळून आलेल्या अज्ञात इसमाच्या मृतदेहाची ओळख पटली असून या व्यक्तीचे नाव हरिश्‍चंद्र ऊर्फ हरी विठोबा मालवणकर ( वय 98 रा. तळवडे, म्हाळाईवाडी) असे आहे.

मृतदेहाच्या शेजारी आढळून आलेल्या अंगावरील शर्ट व टॉवेलवरून त्यांचा पुतण्या दामोदर बाळकृष्ण मालवणकर याने त्यांची ओळख पटवली. दोन दिवसांपासून ते तळवडे येथून बेपत्ता होते. याबाबतची माहिती तपासी अंमलदार महेश जाधव यांनी दिली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी, काल (ता.8) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नेमळे रेल्वे पुलाजवळ मुंबईहून बेंगलोरकडे जाणाऱ्या बेंगलोर एक्‍सप्रेस खाली एक अज्ञात व्यक्ती रेल्वे अपघातात मृत झाल्याची घटना उघडकीस आली होती. याबाबतची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी येथील पोलिसांना दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. दरम्यान, आज तळवडे येथील काही ग्रामस्थांनी तसेच पुतण्या दामोदर मालवणकर यांनी ओळख पटवली.

मृत मालवणकर यांना कुठेही फिरण्याची सवय होती. ओळखीचा माणूस त्यांना वाटेत भेटल्यावर घरी नेऊन सोडत असे. त्यामुळे असेच फिरताना ते नेमळे येथे रेल्वे ट्रॅकवर आले असावेत आणि त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेहाचे विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT