budget of zilla parishad schools rupees 2 and half crore only used by 45 schools in ratnagiri 
कोकण

रत्नागिरीत फक्त 45 शाळांवरच अडीच कोटी पडणार खर्ची!

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेला अडीच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता; मात्र त्यासाठी शाळांची निवड करण्यासह ते शासनाकडे पाठविण्यापर्यंतीच प्रक्रिया पूर्ण झाली, तरीही त्याची माहिती पदाधिकारीच नव्हे, तर सदस्यांनाही नव्हती. हा प्रकार ज्येष्ठ सदस्य उदय बने यांनी स्थायी समितीच्या बैठकीत पुढे आणला. त्यामुळे संतापलेल्या सर्वच सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या प्रकारामुळे पदाधिकारी व सदस्यांना अंधारात ठेवून अधिकारीच कामे करत असल्याचे चित्र पुढे आले. 

जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते. गावपातळीवरील अनेक विकासकामे तडीस नेण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेवर असते. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार हाकत असताना लोकप्रतिनिधींना महत्त्व असते. आराखडा बनवत असताना विकासकामांची यादी, हे याच लोकप्रतिनिधींच्या सूचनांनुसार तयार होते; मात्र शिक्षण विभागाकडून त्याचे उल्लंघन झाल्याचा प्रकार पुढे आला आहे.

सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळा दुरुस्तीसाठी अडीच कोटी रुपयांचा निधी नुकताच प्राप्त झालेला होता. याबाबत शिक्षण सभापतींसह सदस्यही अनभिज्ञ होते. स्थायी समितीच्या सभेमध्ये उदय बने यांनी हा मुद्दा उचलून धरला. दरम्यान, निधी मंजूर झालेला असल्याने तो बदल करता येणार नसला तरीही या प्रकाराबाबत वरिष्ठांकडे जाब विचारण्यावर सदस्यांनी चर्चा केली. 

शिक्षण विभागाच्या भूमिकेवर शंका 

वास्तविक सहा महिन्यांपूर्वी हा निधी आला होता तर पदाधिकारी व सदस्यांना सांगणे गरजेचे होते. सदस्य हा ज्या गटाचे प्रतिनिधित्व करत असतो, त्या गटाची परिस्थिती त्याला माहिती असते. कुठली शाळा प्राधान्याने घेणे गरजेचे आहे, ते तोच सांगू शकतो. यामुळे शिक्षण विभागाची न सांगण्याची भूमिका संशयास्पद असल्याचे सदस्यांनी उपस्थित केले. 

शाळा परस्पर ठरवल्या ऑनलाइन नोंदणीतून

सहा महिन्यांपूर्वी हा निधी आलेला असताना शिक्षण विभागाने पदाधिकाऱ्यांना का अंधारात ठेवले? असा प्रश्‍न बने यांनी सभेत विचारला. त्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी या आराखड्यात घेतलेल्या शाळा परस्पर ऑनलाइन नोंदणीतून ठरवल्या आहेत. यावर सर्वच सदस्य आक्रमक झाले. त्या शाळांची यादी मागविली. त्यात 45 शाळांवर 2 कोटी 50 लाख रुपये खर्ची पडणार आहेत. यादीतील काही शाळांवर अव्वाच्या सव्वा निधी खर्ची पडणार असल्याचे सदस्यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिले. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT