Ratnagiri Crime esakal
कोकण

'तू आईला शिव्या का घालतोस' म्हणत सख्ख्या भावालाच ठार मारण्याची धमकी; पुर्णगड पोलिसांत गुन्हा दाखल

धमकी देणाऱ्या संशयिताविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात (Purnagad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सख्खा भाऊ संशयित राकेश काही कारण नसताना दारूच्या नशेमध्ये आईला घाणेरड्या शिव्या घालत होता.

पावस : तालुक्यातील गणेशगुळे-गुरववाडी येथे ‘आईला शिव्या का घालतोस’, अशी विचारणा करणाऱ्या सख्ख्या भावाला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या संशयिताविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात (Purnagad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राकेश चंद्रकांत नागवेकर असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २३) दुपारी सव्वा एकच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी मुकेश चंद्रकांत नागवेकर हे घरी जेवण करत असताना त्यांचा सख्खा भाऊ संशयित राकेश काही कारण नसताना दारूच्या नशेमध्ये आईला घाणेरड्या शिव्या घालत होता.

हे सर्व चालू असताना ‘तू आईला शिव्या का घालतोस’, असे विचारले असता राकेश याने मुकेशला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यानंतर घराच्या मागील बाजूस ओढत नेऊन डोक्यात कवले मारून त्याला दुखापत केली. तसेच ‘तू जास्त बोललास तर तुला ठार मारून टाकीन’ अशी धमकी दिली. या प्रकरणी मुकेश नागवेकर यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : सोने आणि पेट्रोलबाबतच्या आवाहनाचा परिणाम दिसतोय,लोक प्रतिसाद देताहेत; पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मध्ये सांगितले अनेक अनुभव

Akkalkot Karhunnavi: कारहुण्णवी सणाची लगबग! अक्कलकोटच्या बाजारपेठा सजल्या; बैलांच्या सजावटीच्या साहित्याला वाढती मागणी

'माझी नात मोदींची पूजा करत त्यांच्या फोटोला लाडू भरवते' सुनील शेट्टी म्हणाला...'माझं मोदींजीवर प्रेम आहे.'

Animal Story : कोल्ही–करकोचा प्रेमकथा: जातीपाती, अहंकार आणि अपमानाच्या पलीकडचा धडा

Gold Price Prediction : सोने १ लाख २५ हजारांवर पोहोचणार?, जून महिन्यात ८.२८ टक्क्यांनी दरात घसरण; तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज

SCROLL FOR NEXT