सुधागड तालुक्यात गुरे चोर sakal
कोकण

सुधागड तालुक्यात गुरे चोरट्यांचा धुमाकूळ

कसईशेत येथील 8 गुरे चोरली;अनेक गुरे बेशुद्धावस्थेत सापडली

अमित गवळे - सकाळ वृत्तसेवा

पाली : सुधागड तालुक्यात सध्या गुरे चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी (ता.3) तालुक्यातील कसईशेत गावातील 8 गुरे चोरीला गेली असून अनेक गुरे बेशुद्धावस्थेत पडली होती. याबाबत शेतकरी परशुराम निरगुडा व इतर ग्रामस्थांनी जांभूळपाडा पोलीस दुरक्षेत्र येथे तक्रार दाखल केली आहे.सुधागड तालुक्यातील परळी व जांभुळपाडा विभागात गुरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन बेशुध्द करून चोरून नेणारी टोळी सध्या कार्यरत झाली आहे. शेतकरी परशुराम निरगुडा यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या मालकीच्या वाड्याच्या रिकाम्या मोकळ्या जागेत त्यांची व गावाच्या इतर शेतकऱ्यांची गुरे विश्रांतीला बसतात. मात्र शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गुरांचा आरडाओरडा झाल्याने शेतकरी गुरांच्या ठिकाणी धावले, मात्र गुरे बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले. तर काही गुरे बेशुद्धावस्थेत आढळली होती.

यामध्ये परशुराम निरगुडा, लिंबाजी निरगुडा व नारायण वाघमारे यांची प्रत्येकी दोन गुरे आणि झिमा ठोंबरे व वामन वाघमारे यांची प्रत्येकी एक-एक गुरे चोरीला गेली आहेत. या सर्व गुरांची एकूण किंमत तब्बल 88 हजार इतकी आहे . पोलीस स्थानकात तक्रार देतेवेळी परशुराम निरगुडा, भिवा शिद, गोमा ठोंबरे, उपसरपंच पंकज पाठारे, सदस्य रमेश वाघमारे, माजी उपसरपंच रमेश पाठारे, जगन्नाथ पाठारे, रविंद्र चौधरी, नारायण वाघमारे, पदू वाघमारे, सोमा शिद आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांची गुरे चोरीला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्यानुसार संशयित व अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुरे चोरीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने नाकाबंदी सह आवश्यक ती उपाययोजना करण्यावर भर दिला आहे. मध्यरात्री महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. तसेच ग्रामीण भागात पोलीस व्हॅन गस्त घालणार आहे. मध्यरात्री येणारी संशयास्पद वाहने तपासली जातील, बाहेरच्या वाहनांवर करडी नजर ठेवली जाईल. तसेच काही ग्रामपंचायतींना महत्वाच्या व मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन पोलीस प्रशासनामार्फत केले आहे.

-विजय तायडे, पोलीस निरीक्षक पाली सुधागड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT