कोकण

Chipi airport: पवार-राणेंच्यामध्ये बसणार मुख्यमंत्री; पहा वादग्रस्त निमंत्रण पत्रिका

विनायक होगाडे

सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात कधीकाळी शिवसेनेत एकत्र असणारे हे दोन नेते सध्या एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. गेल्या काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांचं उद्धव ठाकरे यांच्याबाबतचं वादग्रस्त वक्तव्य आणि त्यानंतर त्यांचं अटकसत्र या पार्श्वभूमीवर आजचा हा कार्यक्रम आणि त्यांचं एका मंचावर येणं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे.

वादग्रस्त निमंत्रण पत्रिका

पत्रिकेवर बारीक नाव असल्याने राणे नाराज

हा संपूर्ण कार्यक्रमच पार पडण्याआधी वादाच्या भोवऱ्या सापडला आहे. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राणे यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की, 'माणसाने किती संकुचित असावे? या कार्यक्रम पत्रिकेत माझं नाव बारीक अक्षरात छापले आहे. त्यावर शाईही फाटली आहे. शिवाय ते तिसऱ्या क्रमांकावर टाकलं आहे', अशी नाराजी राणे यांनी नोंदवली. सिंधुदुर्गाचा विकास आपणच केला असून चिपी विमानतळाचे कामही मीच मार्गी लावल्याचंही त्यांनी सांगितलंय. या कामाचे श्रेय माझे आणि भाजपचे आहे, असे म्हणत प्रत्यक्ष कायक्रमातही आम्हीच हे काम केल्याचं सांगणार आहोत, असंही ते म्हणाले आहेत.

कोण कुठे बसणार?

आज तब्बल 20 वर्षांनंतर चिपी विमानतळाचं बांधकाम पूर्ण होऊन त्यांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमात ते एकत्र आल्यावर ते एकमेकांशी बोलणार का, बोलले तर काय बोलणार? मंचावरची त्यांची देहबोली कशी असणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उजव्या बाजूला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची खूर्ची तर डाव्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खूर्ची असणार आहे.

राणेंच्या अटकसत्राचे प्रकरण ताजे

नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर वारंवार शिवसेनेला आपल्या अंगावर घेतलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ते अजिबात कचरत नाहीत. त्यांच्या याच स्वभावगुणामुळे त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर एकच गजहब माजला होता. याप्रकारच्या चुकीच्या वक्तव्याची ढाल करत मग शिवसेनेनेही नारायण राणे यांना कोंडीत पकडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ही सगळी घडामोड अद्याप ताजी असतानाच आता दुसरीकडे ते एका मंचावर येणार असल्याने सगळे या कार्यक्रमाबाबत उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: एकाचा पत्ता सुलभ शौचालय, बसल्या बसल्या सही घेतली का? राज ठाकरेंचा आरोप; निवडणूक अधिकार्‍यांचे स्पष्टीकरण

मोठी बातमी! 21 नोव्हेंबरला DK शिवकुमार होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री? सिद्धरामय्यांचं काय होणार? काँग्रेस सरकारवर मोठं संकट

Sikandar Shaikh Crime : पैलवान सिकंदर शेखच्या अटकेनंतर घरच्यांनी दिली प्रतिक्रिया म्हणाले...

Kabutarkhana: चार नवीन कबुतरखान्यांसाठी परवानगी, पण बाकीचे बंदच...; पालिकेचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे लोकलने चर्चगेटला रवाना, सत्याचा मोर्चात सहभागी होणार

SCROLL FOR NEXT