कोकण

चिपीत विमान उतरण्याचा मुहूर्त बुधवारी

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली/सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्गातील पहिल्या विमान उड्डाणाला अखेर १२ सप्टेंबरचा मुहूर्त मिळाला असून, या दिवशी येथे पहिली उड्डाण चाचणी घेतली जाणार असल्याची घोषणा नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने केली.

सिंधुदुर्गातून नियमित विमानसेवा सुरू व्हावी म्हणून विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू विशेष आग्रही होते. यासाठी त्यांनीच विमानतळ व्यवस्थापन कंपनी आणि राज्य सरकारला प्रलंबित समस्या तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले होते.

सिंधुदुर्गातील परूळे चिपी (ता. वेंगुर्ले) येथे पहिले विमान उतरणार असल्याचे मंत्रालयातील अधिकाऱ्याने ट्‌विटरवरून जाहीर केले. या विमानतळ प्रकल्पाच्या अनुषंगाने संभाव्य अडथळ्यांचे सर्वेक्षणदेखील पूर्ण झाले असून, अडीच हजार मीटरच्या रन-वेचे कामही युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे. चारशे प्रवाशांसाठीच्या टर्मिनल बिल्डिंगचे काम पूर्ण झाले असून, एटीसी टॉवरदेखील काही दिवसांत बांधून पूर्ण होईल, असा विश्‍वास काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील विमानतळांमुळे कोकणचा उर्वरित राज्याशी असलेला संपर्क अधिक बळकट होऊन येथील पर्यटनालाही चालना मिळेल, असा विश्‍वास प्रभू यांनी व्यक्त केला आहे. उत्तर कर्नाटक, पश्‍चिम महाराष्ट्र आणि गोव्याचा काही भाग या दोन्ही विमानतळांमुळे जोडला जाणार असून त्यामुळे प्रवासदेखील गतिमान होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

चारशे प्रवासीक्षमतेचे विमान
हे विमानतळ चारशे प्रवासीक्षमतेचे आहे. रोज येथून चारशे प्रवासी ये-जा करू शकतील. येथे अत्याधुनिक सोयी-सुविधाही असतील. यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, असे श्री. प्रभू यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli MIDC Blast Update: डोंबिवली अपघातस्थळी आणखी 3 मृतदेह सापडले, एकूण मृतांचा आकडा 11 वर

Share Market Today: शेअर बाजारातील विक्रमी वाढ कायम राहणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Rahul Gandhi : भाजपच्या दृष्टीने महिला दुय्यम;दिल्लीतील सभेत राहुल गांधींचे टीकास्त्र

Latest Marathi News Live Update: अंबादास दानवे डोंबिवली स्फोट दुर्घटनास्थळी

Malaysia Masters : दुसऱ्या फेरीत कोरियाच्या यू जिनविरुद्ध तीन गेममध्ये सिंधूचा संघर्ष

SCROLL FOR NEXT