chiplun school started but response is poor
chiplun school started but response is poor 
कोकण

शाळा सुरु झाल्या पण दोन-चार दिवस थांबू आणि मुलांना शाळेत पाठवू

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : राज्य सरकारने नववी ते बारावी दरम्यान शाळा सुरू करण्यास मान्यता दिल्यानंतर तब्बल 9 महिन्यांनी शाळांची घंटा वाजली. 90 ते 95 टक्के पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास संमत्ती दिली. मात्र प्रत्यक्षात आज पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा थंडा प्रतिसाद मिळाला. कोरोना थोडा वाढतोय, दोन-चार दिवस थांबूया आणि मुलांना शाळेत पाठवू, अशी भूमिका पालकांकडून घेतली जात आहे.


सरकारने नियम अटी घालून शाळा सुरू करण्यास मान्यता दिली होती. त्यानुसार शाळांनी वर्गांची स्वच्छता करीत जंतुनाशक फवारणी केली. आज सकाळी साडेआठच्या सुमारास विद्यार्थी शाळेत येताच त्यांचे तापमान आणि ऑक्सिजनची मोजणी करण्यात आली. शाळेच्या आवारात सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्यांनी पालकांचे संमत्तीपत्र आणले आहे, त्यांनाच प्रवेश देण्यात आला. तर किरकोळ विद्यार्थ्यांकडे संमत्तीपत्र नव्हते. शिक्षकांनी त्यांच्या पालकांशी चर्चा केल्यानंतर त्यांना प्रवेश दिला. कोरोनानंतरच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा थंडा प्रतिसाद मिळाला. जेमतेम 15 ते 20 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. भीतीदायक, तणावात्मक परिस्थिती विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर जाणवत होती. किरकोळ पालक विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी शाळेत आले होते.

बहुतांशी विद्यार्थी स्वतःच हजर राहिले. सती चिंचघरी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शेकडो विद्यार्थ्यांची संख्या असल्याने मुख्याध्यापक राजेंद्र वारे यांनी काटेकोर नियोजन केले होते. दोन सत्रात शाळा भरवली. शाळेत जे शिक्षक शिकवत होते, तोच विषय ऑनलाइनद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला जात होता. जेणेकरून एकच विषय दोनदा शिकवायला लागू नये, अभ्यासक्रम वेळेत पूर्ण व्हावा, याची दक्षता घेतली जात होती. शाळेत विद्यार्थी येताना आणि जाताना गर्दी होणार नाही. याची दक्षता घेतली जात होती.  

आजपासून शाळा सुरू झाल्या असल्या तरी अनेक पालकांमध्ये कोरोना ससंर्गा विषयी साशंकता आहे. सरकार पण कोरोना वाढतोय म्हणून सांगते. त्यामुळे दोन-चार दिवस माहोल पाहून मुलांना शाळेत पाठवावे असा विचार मनात येतोय.
किशोर कदम, पालक, तिवरे

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: केएल राहुलने जिंकला टॉस, लखनौ संघात मोठा बदल; जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT