Coastal Tourism At Aronda Kiranpani MLA Deepak Kesarkar Comment
Coastal Tourism At Aronda Kiranpani MLA Deepak Kesarkar Comment 
कोकण

आरोंदा - किरणपाणी येथे किनारी पर्यटन ः आमदार दीपक केसरकर

सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग) - आरोंदा-किरणपाणी परिसरात तेरेखोल खाडी किनारी पर्यटन प्रकल्पांची लवकरच सुरूवात करण्यात येणार आहे. शेती संरक्षक बंधारे मजबूत करण्याला प्रधान्य देण्यात येईल, असे आश्‍वासन माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आरोंदा येथे केले. 

आरोंदा-किरणपाणी येथे केसरकर यांनी भेट दिली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, आरोंदा बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी बाळ आरोंदेकर, विद्याधर नाईक, माजी उपसरपंच अशोक नाईक, बबन नाईक - गावकर, शिवसेना विभाग प्रमुख आबा केरकर, शिवसेना शाखाप्रमुख प्रशांत नाईक, युवासेना पदाधिकारी बाबू नाईक उपस्थित होते. 

खाडी किनारपट्टीवरील सर्व शेती संरक्षक खारबंधारे दुरुस्त करून मजबूत करण्याचे काम प्रथम केले जाणार आहे. यानंतर पर्यटन प्रकल्पांची उभारणी केली जाईल. अधिकाधिक रोजगार निर्मिती करणारे पर्यटन प्रकल्प आणावे, अशी मागणी बाळ आरोंदेकर, अशोक नाईक यांनी केली. पर्यटन प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने संपूर्ण तेरेखोल खाडीचा सचित्र आढावा घेणार असल्याचे यावेळी केसरकर यांनी स्पष्ट केले. 

कांदळवनाचे संरक्षण करणार 
आमदार केसरकर यांनी बोटीतून कार्यकर्त्यांसोबत तेरेखोल खाडीची सफर केली. यावेळी किनारपट्टीची पाहणी करतानाच या खाडी परिसरात असलेल्या कांदळवनाचाही आढावा घेतला. या भागात शेकडो एकर जमिनीत कांदळवन पसरले आहे. या कांदळवनाचा विकास पर्यटनदृष्ट्या करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. येथील कांदळवनाचे संवर्धन करण्याची नितांत गरज आहे. अन्यथा या खाडीतील जैवविविधता धोक्‍यात येण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावर आमदार केसरकर यांनी शेकडो एकर जागृत विस्तारलेल्या कांदळवनाचे निश्‍चितपणे संरक्षण करण्याचे आश्‍वासन दिले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT