Congress leader Prashant Yadav joins Sharad Pawar NCP esakal
कोकण

कोकणात काँग्रेसला धक्का; 'हा' नेता राष्ट्रवादीत प्रवेश करताच जयंत पाटलांनी उमेदवारी केली जाहीर

यादवांच्या पक्षप्रवेशामुळे आमदार शेखर निकम (Shekhar Nikam) यांना आगामी निवडणुकीसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याचे मानण्यात येत आहे.

चिपळूण : येथील काँग्रेसचे (Congress) तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षात (NCP) जाहीर प्रवेश केला आहे. मुंबई येथे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत यादवांनी हातावर घड्याळ बांधून प्रवेश केला. आगामी विधानसभेसाठी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीकडून यादव हे उमेदवार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

यादवांच्या पक्षप्रवेशामुळे आमदार शेखर निकम (Shekhar Nikam) यांना आगामी निवडणुकीसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून यादव हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेर शनिवारी खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत यादव राष्ट्रवादीत सामील झाले आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राजकीय घडामोडी वाढू लागल्या आहेत. चिपळूणमध्ये कोकणातील पहिली घडामोड समोर आली आहे. यादव हे गेली काही वर्षे काँग्रेसमध्ये कार्यरत होते. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना तालुकाध्यक्षपद दिले. त्या आधी ते काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक होते; मात्र काँग्रेसने जिल्हाध्यक्षपदाला डावलले आणि चिपळूण तालुका काँग्रेसची जबाबदारी सोपवली. या आधी त्यांनी दोनवेळा राजीनामा दिल्यानंतरही पक्षाने तो राजीनामा नामंजूर केला होता.

अखेर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यादव यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे हातावर घड्याळ बांधले आहे. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी आमदार रमेश कदम, जिल्हाध्यक्ष बारक्याशेठ बने उपस्थित होते.

यादव यांनी चिपळूण तालुक्यासह जिल्हाभरात वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायात अनेक लोकांना आणले आहे. कोकणात दुग्ध क्रांती करण्याचा संकल्प सोडला आहे. त्यात झालेल्या कृषी मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी लोकांना दुग्ध व्यवसायाकडे वळण्याचे आवाहन केले. त्यांच्या प्रवेशानंतर शरद पवार गट राष्ट्रवादीच्या गोटात आनंद व्यक्त करण्यात येत असून चिपळूणमध्ये त्यांचे जोरदार स्वागत होणार आहे.

चिपळुणात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी

आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याचे मानण्यात येत आहे. कारण, चिपळूण विधानसभा मतदार संघावर राष्ट्रवादी शरद पवार गटाने दावा सांगितला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार गट ही जागा लढवणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभेचा उमेदवार म्हणून यादव यांच्याकडे पाहिले जात आहे. चिपळूण मतदार संघात सद्यःस्थितीत अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम हे सत्ताधारी म्हणून सक्रिय आहेत. त्यांनी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघात आपला पाया भक्कम केला आहे; मात्र त्यांच्याच विरोधात शरद पवार गटाच्या माध्यमातून यादव हे उभे राहणार, असे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

Marathi News Live Updates: अंगारकी चतुर्थीनिमित्त मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण

World Heart Day 2026: कार्डिओफोबिया म्हणजे काय? लक्षणे, कारणे आणि उपचार याबद्दल संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT