chiplun
chiplun sakal
कोकण

केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात काँग्रेसची निदर्शने

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : भाजप सरकारने लादलेल्या शेतकरी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी दिल्ली येथे ११ महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत. तरीही भाजप सरकारने त्याची दखल घेतली नाही. याउलट आंदोलन दडपण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चिपळुणात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी मोदी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरात राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने सोमवारी भारत बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुका काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली बाजारपुलाजवळ आंदोलन करण्यात आले.

यावेळी शहरासह ग्रामीण भागातील कार्यकर्ते, व्यापारी, महिला, सहभागी झाल्या होत्या. भाजप सरकारचा निषेध करताना तालुकाध्यक्ष यादव म्हणाले, शेतकरी न्याय मिळण्यासाठी ११ महिन्यापासून दिल्लीत उपोषण करीत आहेत. तरीही केंद्र सरकार त्याची दखल घेत नाही. त्याउलट आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकरी आंदोलकांवर खोटे आरोप केले जात आहेत. तरीही बळीराजा माघार घेत नाही. भाजप सरकारने सत्तेवर येण्यासाठी मतदारांना आमिषे आणि खोटी आश्वासने दिली होती.

भाजप सरकारच्या निषेधाचे फलक

प्रदेश सरचिटणीस इब्राहिम दलवाई यांनीही भाजपवर कडाडून टीका केली. यावेळी मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकारचा धिक्कार असो, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. कार्यकर्ते भाजप सरकारच्या निषेधाचे फलक हाती घेऊन घोषणा देत होते. यावेळी नगरसेवक करामत मिठागरी, शौकत काद्री, सर्फराज घारे, निर्मलाताई जाधव, अश्विनी भुस्कुटे, राकेश दाते, गौरी हरदारे, वासुअप्पा मेस्त्री, अन्वर जबले, गुलजार कुरवले, सुनील सावर्डेकर आदी उपस्थित होते.

व्यापारी पूरग्रस्तांचाही पाठिंबा

तालुकाध्यक्ष यादव पुढे म्हणाले, या सरकारच्या कारभारामुळे देशभरात दोन कोटी तरुण बेरोजगार झाले आहेत. सरकारी संस्था खासगी केल्या जात आहेत. यामुळे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतानाच बेरोजगार तरुणांना न्याय मिळण्यासाठी आणि लोकांमध्ये जागृती होण्यासाठी हे आंदोलन आहे. समाजाच्या सर्व स्तरातील घटकांचा आम्हाला पाठिंबा मिळतो आहे. चिपळुणातील नागरिक, व्यापारी पूरग्रस्त असतानाही ते आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT