coronavirus issue and press conference sandesh parker kankavli sindhudurg
coronavirus issue and press conference sandesh parker kankavli sindhudurg 
कोकण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पारकरांकडून आमदार राणे लक्ष्य, गंभीर टीका

सकाळ वृत्तसेवा

कणकवली (सिंधुदुर्ग) - कणकवली तालुक्‍यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे राणेंच्याच संस्थेतील एका कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे कोरोनाचा समुह संसर्ग सुरू झाला आहे. संपूर्ण कणकवली तालुका कोरोना संकटात असताना या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार नीतेश राणे कुठे लपून बसले आहेत?, असा सवाल शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केला. 

येथील शिवसेना संपर्क कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार वैभव नाईक, राजू शेट्ये, ऍड. हर्षद गावडे, शैलेश भोगले आदी उपस्थित होते. पारकर म्हणाले, कणकवली तालुक्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्‍यात आला होता; पण राणेंच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार मुंबईतून आले. त्यानंतर 14 दिवस विलगीकरण न होता, कर्मचाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. त्यामुळे ते कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या काही नागरिकांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह येण्यास सुरवात झाली आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कर्मचारी आणि त्यांचा मित्रपरिवार मोठा असल्याने संपूर्ण तालुक्‍यात आता कोरोना प्रादुर्भावाचा धोका आहे. 

मतदारसंघात असायला हवे 
कणकवली तालुका कोरोना संकटात असताना आमदार नीतेश राणे यांनी मतदारसंघात असणे गरजेचे होते. एवढेच नव्हे तर त्यांनी कर्मचाऱ्यांचीही विचारपूस करणे आवश्‍यक होते. पण ते कणकवलीत फिरकलेले नाहीत. दुसरीकडे राणेंच्या संस्थेतील रजिस्ट्रारच्या हयगयीमुळे संपूर्ण तालुका धोक्‍यात आला आहे. त्याबाबतही संपूर्ण तालुकावासीयांतून चीड व्यक्‍त होत असल्याचे श्री.पारकर म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT