Crime Against Youth Who Spit On Road Sindhudurg Marathi News 
कोकण

तो थुंकला रस्त्यावर अन्...

सकाळवृत्तसेवा

मालवण ( सिंधुदुर्ग ) - तंबाखू खावून रस्त्यावर थुंकणे एका तरुणाच्या चांगलेच अंगलट आले. थुंकलेला रस्त्याचा भाग पाण्याने धुऊन काढण्याबरोबरच दंडात्मक कारवाईला त्या तरुणाला सामोरे जावे लागले. हा प्रकार आज देऊळवाडा येथील तपासणी नाक्‍यावर घडला. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध घातले असून याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे शहरात सध्या या पार्श्‍वभूमीवर कडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. आज सकाळी देऊळवाडा भागात पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर हे गस्त घालत होते.

याच दरम्यान तेथे आलेल्या एका मोटारीतील एक तरुण रस्त्यावर तंबाखू खावून थुंकला. हा प्रकार लक्षात येताच मुख्याधिकाऱ्यांनी ती गाडी थांबवून त्या तरुणाला रस्त्यावर ज्या ठिकाणी थुंकला तो भाग पाण्याने धुण्यास सांगून तो धुवून घेतला. त्यानंतर त्याच्यावर 150 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जात असून केलेल्या नियमाची कडक अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे गुटखा, तंबाखू खाणाऱ्यांनो सावधान यापुढे सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, गुटखा खावून थुंकल्यास प्रशासनाच्या कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Satam : मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी निवड झालेले अमित साटम कोण? वाचा राजकीय कारकीर्द...

Gold-Silver Rate: शेअर बाजारात जोरदार वाढ; तर सोन्या-चांदीचे भाव घसरले, जाणून घ्या आजचा भाव

Vi Recharge : फक्त 1 रुपयांत जिंका 4999 वाला रिचार्ज; 'या' बड्या कंपनीची जबरदस्त ऑफर, यूजर्सचा फायदाच फायदा

Chhagan Bhujbal : मराठा समाज ओबीसीत येऊ शकत नाही; छगन भुजबळांचा स्पष्ट इशारा

Kolhapur Dahihandi: ‘नृसिंह गोविंदा’ तीन लाखांचे मानकरी; सात मनोरे रचून फोडली धनंजय महाडिक युवा शक्तीची दहीहंडी

SCROLL FOR NEXT