

Severe Night Sweats Explained
Sakal
severe night sweating causes: काही शारीरिक लक्षणांची अनेकांना भीती वाटते. त्यात छातीत दुखणे, दरदरून घाम येणे, अचानक चक्कर येणे ही लक्षणे मुख्य असतात. अनेक रुग्णालयातल्या रात्रीच्या आत्यंतिक तातडीच्या सेवेसाठी सज्ज असलेल्या इमर्जन्सी रूममध्ये अगदी दररोज या लक्षणांचे अनेक रुग्ण हजेरी लावत असतात. त्यातही एखाद्याला रात्री झोपेत असताना जर घाम फुटला, तर त्याचे संपूर्ण कुटुंब धावपळ करत जवळच्या डॉक्टरांचे दरवाजे ठोठावतात किंवा रुग्णालयात भरती करतात.