कोकण

कुत्र्याचा कामगारावर हल्ला, मालकावर गुन्हा; रत्नागिरीतील घटना

कामगाराचा मृत्यू; पाच महिन्यांनी कारवाई

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : देखभाल करणाऱ्या कामगारावरच रॉटव्हिरल जातीच्या कुत्र्याने हल्ला केल्याने कामगाराचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयित म्हणून मालकावर गुन्हा दाखल झाला आहे. संजय उर्फ बाळा कृष्णा मयेकर (वय 57, रा. कृष्णानंद निवास मुरुगवाडा, भैरी मंदिराजवळ, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना 12 डिसेंबर 2020 ला सकाळी सव्वा नऊच्या सुमारास मुरुगवाडा येथे घडली होती.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयेकर यांचा रॉटव्हिलर जातीच्या कुत्र्याची देखभाल दिवाकर एकनाथ पाटील (वय 55, रा. पावस, रत्नागिरी) हा कामगार करीत होता. मात्र, कुत्र्याने अचानक पाटील यांच्यावर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. संशयिताने प्राण्यांबाबत हयगयीचे वर्तन व त्यांचा निष्काळजीपणा केला. या प्रकरणी पोलिस हवालदार दीपक जाधव यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी सोमवारी (26) ला संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार, शिंदेसेनेला मिळणार आणखी दोन मंत्रीपद? या बड्या नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवणार!

IPL 2027 Trade : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आणखी एक खळबळ! 'स्टार' खेळाडूला थेट कर्णधारपदाची ऑफर, त्याच्या भूमिकेकडे लक्ष...

अभिनेत्री प्रियदर्शिनीने दिली प्रेमाची कबुली, बॉयफ्रेंडने समुद्रकिनाऱ्यावर केलं प्रपोज, फोटो होतायत व्हायरल

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का? खासदारांनंतर आता आमदारही शिंदेंच्या वाटेवर? बैठकीला चार आमदारांची दांडी

Vaibhav Sooryavanshi ची पुढची मॅच कधी? जिथं १९ वर्षांपूर्वी रोहित शर्माचं पदार्पण झालं, तिथेच खेळण्यास सज्ज! संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

SCROLL FOR NEXT