crime case in kankavli one person arrested by police for checking facts in kolhapur 
कोकण

कोकण : कलमठच्या युवकास कोल्हापूर पाेलिसांनी घेतले ताब्यात

तुषार सावंत

कणकवली (सिंधुदुर्ग) : कोल्हापूर शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पिस्तूल प्रकरणातील गुन्ह्याबाबत कलमठ (ता. कणकवली) येथील युवकास शाहूपुरी पोलिसांनी गुरुवारी सकाळच्या सुमारास ताब्यात घेतले. कलमठ येथील त्या युवकांकडून आपण पिस्तूल घेतले होते, अशी कबुली संशयित आरोपीने दिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. शाहूपुरी पोलीस या युवकास घेऊन कोल्हापूरला रवाना झाले आहेत. मात्र युवकाविरोधात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

ताब्यात घेतलेल्या कलमठ येथील युवकाने आपणाला पिस्तूल दिल्याची माहिती कोल्हापूर येथे अटकेत पोलिसांना दिली. त्याच तपासासाठी कलमठच्या युवकाला ताब्यात घेण्यात आल्याचे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले. तसेच चौकशीअंती त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

शाहपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिस्तूल बाळगल्याबाबत सरवडे - राधानगरी येथील तावडे नामक युवकास शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. सध्या त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली असुन घटनेचा तपास शाहपुरीचे पोलीस निरीक्षक करीत आहेत. तावडे याने सदरचे पिस्तूल कोठून आणले याचा तपास सुरु होता. हे पिस्तूल त्याने कलमठ येथील युवकाकडून आणल्याचे तपासात पुढे येत आहे. पोलिसांनी तावडे याला बोलते केले असता, तावडे व कलमठ येथील युवक यांची परस्परांशी चांगली ओळख असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार शाहूपुरी पोलिसांचे पथक गुरुवारी सकाळी कणकवलीला पोहोचले पथकात हवालदार सुहास पवार, पोलीस नाईक प्रशांत घोलप होते. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT