कोकण

तब्बल 72 लाखांची दारू इन्सुलीत पकडली; 4 जणांना अटक

सकाळ डिजिटल टीम

बांदा : गोव्यातून थेट मध्यप्रदेशकडे वाहतूक करण्यात येणारी तब्बल 72 लाखांची दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने इन्सुली येथे पकडली. याप्रकरणी मध्यप्रदेशच्या चौघा संशयितांना अटक करण्यात आली. या कारवाईत आठ लाखाचा ट्रकसह तब्बल ऐंशी लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे सहाय्यक दुय्यम निरीक्षक शिवाजी काळे यांनी दिली.

रोशन ओमप्रकाश पाल, ओमप्रकाश पाल (दोघे रा. इंदौर), दिलीप कमल रावत, रुपेश पंढरी सेन (दोघे रा. मध्यप्रदेश) अशी या चौघा संशयितांची नावे आहेत. ही कारवाई रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्कच्या तपासणी नाक्यासमोर करण्यात आली. यासाठी सहकारी अधिकारी शैलेश चव्हाण, रमेश चंदुरे, संदीप कदम, शरद साळुंखे आदींनी सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

Latest Marathi News Live Update : कल्याणमधून श्रीकांत शिंदे अर्ज भरणार, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT