crime news in ratnagiri illegal alcohol found by officers rupees one lakh in ratnagiri 
कोकण

गावठी दारूविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले ; हातभट्टीवर धाड, दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : तालुक्‍यातील बोरगाव येथे हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने नुकतीच धाड मारून 1 लाख 50 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये रिक्षाचा समावेश आहे. या कारवाईने गावठी दारूधंदा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत हातभट्टी निर्मुलन कार्यक्रमांतर्गत उपअधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांनी अवैध दारू विरोधात मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत गेल्या महिन्यात गावठी दारूधंद्यासह गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा व मुद्देमाल जप्त केला होता. बोरगाव येथे हातभट्टी सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. यानुसार विभागीय उपआयुक्त वाय. एम. पवार, अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथक व चिपळूण कार्यालयाने संयुक्तपणे धाड टाकली. 

यावेळी गावठी दारू रसायन व दारूच्या कॅनने भरलेली तीन चाकी रिक्षा असा एकूण 1 लाख 50 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई उपअधीक्षक व्ही. व्ही. वैद्य, चिपळूणचे निरीक्षक सुरेश पाटील, भरारी पथकाचे उपनिरीक्षक किरण पाटील, निखिल पाटील, जवान विशाल विचारे, मिलिंद माळी, सागर पवार, निनाद सुर्वे, सावळाराम वड, अतुल वसावे, अर्षद शेख यांनी केली. या प्रकरणी यशवंत हळदणकर व सोमा आग्रे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Monorail : मुंबईकरांसाठी मोठी बातमी ! मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद , MMRDA ने का घेतला निर्णय ?

Asia Cup 2025 : आशिया कपमधून माघार घेतल्यास पाकिस्तान बोर्ड लागणार भिकेला? तब्बल 'इतक्या' दशलक्ष डॉलरचं होईल नुकसान

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन; 75 व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

Karad Accident: दुर्दैवी घटना! 'कालेटेकच्या दोघांचा अपघाती मृत्यू'; भरधाव चारचाकीची मोटारसायकला पाठीमागून भीषण धडक..

मोठी बातमी! संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील ‘या’ लाभार्थींना आता दरमहा मिळणार २५०० रुपये; सामाजिक न्याय विभागाचा निर्णय; ऑक्टोबरपासून वाढीव लाभ

SCROLL FOR NEXT