curfew in Ratnagiri on tomorrow in the wake of the cyclone 
कोकण

सावधान ! चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 3 जूनला रत्नागिरीत संचार बंदी...

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - चक्रीवादळामुळे जिल्हयाच्या किनारपट्टीलगतचा भाग वगळता अन्य भाग ही प्रभावित होवू शकतो. त्यामुळे जिल्हयातील नागरिकांची जिवित व वित्त हानि होवू नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम - 2005 चे कलम 34 अन्वये संचार बंदी लागू केली आहे.

समुद्रामध्ये जावु नये

दिनांक 03 जून 2020 रोजी लोकांना त्यांच्या अत्यावश्यक सेवा विषयक बाबीसाठी वगळून अन्य कोणत्याही गोष्टीसाठी जिल्हयात एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी संचार करणेस या आदेशान्वये बंदी आणत आहे. सदर कालावधीत लोकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.मच्छीमार व अन्य व्यक्तींनी समुद्रामध्ये जावु नये.

अशी घ्या काळजी...

घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरुपाचे असेल तर तात्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षीत स्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेवुन स्थलांतरीत व्हावे.
घराच्या अवती भवती वादळामुळे कोणत्या वस्तु, विेजेचे खांब किंवा तारा, झाडे इ. पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तुंपासून लांब रहावे. आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे. केरोसीनवर चालणारे बंदिस्त दिवे (कंदिल) बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी, या वस्तु उजेड व खाद्यपदार्थ बनवण्यासाठी उपलब्ध ठेवाव्यात.

हवामान खात्याकडून मिळणारे इशारे समजण्यासाठी जवळ रेडिओ बाळगावा. त्यासाठी काही जास्त बॅटऱ्या जवळ ठेवाव्यात.
सोबत आवश्यक अन्नधान्य, पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवावे.
मच्छिमारांनी आपल्या बोटींचे नुकसान होवु नये म्हणुन त्यांना सुरक्षितपणे बांधुन ठेवण्याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात.

तर इथे संपर्क साधावा...

अतिवृष्टी व चक्रीवादळ याचा एकत्रित फटका टाळण्यासाठी समुद्र किनारी व नदीकिनारी राहणा-या लोकांनी सावधगिरी बाळगावी. ग्रामकृतीदलाच्या सुचनेनुसार व जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सुरक्षित उपाययोजना कराव्यात. मदत आवश्यक असल्यास आपले ग्रामपंचायत, तहसिलदार कार्यालय, जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक 02352- 226248, 222233 वर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

SCROLL FOR NEXT