इथे घडते नवरात्रोत्सवातून एकोप्याचे दर्शन
इथे घडते नवरात्रोत्सवातून एकोप्याचे दर्शन sakal
कोकण

इथे घडते नवरात्रोत्सवातून एकोप्याचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा

मंडणगड ः जय भवानी मित्र मंडळ व रिक्षा संघटना देव्हारेच्या माध्यमातून गेल्या सत्तावीस वर्षांपासून एकता, समता, बंधुत्व आणि सामंजस्य निर्माण करणारा नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. यातून सर्वधर्मीय नागरिकांमध्ये एकोपा व एकजूट अशी विविधतेतून एकतेचे दर्शन घडून येत आहे. मंडळाने विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधीलकी जपण्याचे काम केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी समाजहिताचे उपक्रम राबवून हा उत्सव साजरा करण्यात येत आहे.

अनेक धर्माचे रिक्षा व्यावसायिक, दुकानदार संघटनेचे सभासद आहेत. व्यवसाय करत असताना अनेक अडचणी येतात. त्यातून वादविवाद निर्माण होत असतात. मात्र, ग्रामीण भाग असूनही या संघटनेतील सदस्यांनी आपली एकजूट कायम ठेवत मोठ्या गुण्यागोविंदाने एकत्र राहून हा उत्सव साजरा करीत आहेत.

परिसरातील अनेक पंचक्रोशीतील सर्व धर्मांचे नागरिक उपस्थित राहून दर्शन घेतात. त्यात विविधतेतून एकतेचा संदेश मिळतो. चिंचघर येथील भारजा नदी पात्रात मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. उत्सव साजरा करण्यासाठी अध्यक्ष अजय म्हाब्दी, उपाध्यक्ष हरिश्चंद्र फराटे, सेक्रेटरी रामचंद्र फराटे, विपुल म्हाब्दी, तुषार करावडे आदी परिश्रम घेत आहेत.

१९९२ सालापासून..

१९९२ साली मंडणगड तालुक्यातील देव्हारे बाजारपेठ परिसरात रिक्षा स्टॅंडजवळ संघटनेच्या वतीने नवरात्र उत्सव सुरू करण्यात आला. एका छोट्या झोपडीतून सुरू झालेला हा उत्सव आज मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT