Decreased number of containment zones in Ratnagiri district 
कोकण

दिलासा : रत्नागिरी जिल्ह्यात घटली कन्टेनमेंट झोनची संख्या

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक शुभ वार्ता आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या क्षेत्रास कोरोना विषाणू बाधित क्षेत्र घोषित केले जाते. अशा विषाणू बाधित क्षेत्र अर्थात कन्टेनमेंट झोनची संख्या 130 वरून 30 झाली आहे. परंतु रविवारी (ता. 14) रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार आणखी 13 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 431 झाली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही. 

जिल्ह्यात सध्या 30 ऍक्‍टिव्ह कन्टेन्मेंट झोन आहेत. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्‍यात 3 गावांमध्ये, गुहागर- 1, खेड- 4, संगमेश्वर- 2, दापोली- 5, लांजा- 1, चिपळूण-6, राजापूर- 6 आणि मंडणगडमधील 2 गावांचा समावेश आहे. 

जिल्ह्यात दिवसभरात चौघे कोरोनामुक्त झाले. त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे कोरोनामुक्तांची टक्केवारी 70 टक्के झाली. कोरोनाने आत्तापर्यंत 17 मृत्यू झाले आहेत. सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 109 आहे. दिवसभरात कोव्हीड केअर सेंटर सामाजिक न्याय भवन येथील तीन आणि जिल्हा शासकीय रुग्णालय येथील एका रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे. आज सकाळपर्यंतचे 13 पॉझिटिव्ह रुग्ण आढलले. त्यामध्ये कळंबणी (खेड) - 9, रत्नागिरी- 3 आणि देवरुखमधील एकाचा समावेश आहे. कन्टेनमेंट झोनची जिल्ह्यातील संख्या 130 होती. मात्र आता ती 30 झाली आहे. एकूण 48 गावांपैकी 18 गावांचा 14 दिवसांचा कालावधी आज संपला आहे. संस्थात्मक विलगीकरणात 37 संशयित रुग्ण दाखल आहेत. आजअखेर होम क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या 51 हजार 355 इतकी आहे. 


           जिल्ह्यातील स्थिती 

  • एकूण बाधित रुग्ण -431 
  • पैकी बरे झालेले रुग्ण -305 
  • सध्या उपचार सुरू असलेले -109 
  • जिल्ह्यातील मृत्यू - 17 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: एकापेक्षा जास्त घरे घेणाऱ्यांना चाप बसणार, प्रशासन थेट कारवाई करणार; सरकारी योजनेतील घरांसाठी नवा नियम

Beed : १० वर्षांपासून फरार पण, प्रचारसभांमध्ये सहभाग; अखेर शिवसेनेच्या बड्या नेत्याला बीडमधून उचललं

नाना पाटेकर गावात एकटे राहतात तरी कसे? म्हणाले- फार्महाउसवर गाय- बैल आहेत, सकाळचा नाश्ता झाला की...

पुढील ५ वर्षांत तू स्वतःला कुठे पाहतोस? अर्जुन तेंडुलकरचं प्रांजळ उत्तर... सचिनसोबतच्या तुलनेवर म्हणाला, मला कोणाला काही सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही

तिरछी टोपी वाले या गाण्यामुळे रातोरात प्रसिद्ध झालेली ती अभिनेत्री झाली अचानक गायब ; सध्या काय करते ?

SCROLL FOR NEXT