कोकण

करंजेश्‍वरी देवस्थानच्या पुजाऱ्याला अटक न झाल्यास मोर्चा

सकाळवृत्तसेवा

चिपळूण - करंजेश्‍वरी देवस्थानच्या पुजाऱ्याविरोधात कारवाई व्हावी, त्याला अटक न झाल्यास मोर्चा काढू, असा इशारा पेठमाप, गोवळकोट ग्रामस्थांनी पोलिसांना दिल्याची माहिती, देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रसाद चिपळूणकर यांनी ‘सकाळ’ला दिली.

गोवळकोट येथील श्री देवी करंजेश्‍वरी देवस्थानच्या पुजाऱ्याने वेबसाइट तयार करून भक्तांकडून लाखोंच्या देणग्या स्वीकारल्याची तक्रार चिपळूण पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. १२) देवस्थान समितीने दिली, मात्र याप्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. 

ॲड. चिपळूणकर म्हणाले, ‘‘आम्ही देवस्थानच्या व्यवस्थापकाला आर्थिक व्यवहार करण्याचे कोणतेही अधिकार दिले नव्हते. वेबसाइट स्वतःच्या मालकीची असल्याचा दावा काटदरे करत असले तरी श्री देव करंजेश्‍वरी देवस्थानच्या नावाने वेबसाइट आहे आणि त्यावर काटदरे यांचा मोबाईल नंबर, बॅंक खाते क्रमांक आहे.

देवस्थानचे फोटो, माहिती वेबसाइटवर आहे. ते स्वतः देवस्थान चालवित असल्याचे वेबसाइटवरून दिसते. त्यांनी आमचीच नव्हे, तर भक्तांचीही दिशाभूल केली आहे. देवस्थानची वेबसाइट आहे, याबाबत त्यांनी आम्हाला कोणतीही माहिती दिली नाही. त्यांची सात बॅंकांमध्ये खाती आहेत. बॅंकेचा खाते उतारा तपासल्यानंतर कोटीच्या घरात त्यांची उलाढाल आहे. त्यांचा इतर कोणताही व्यवसाय नाही, मग हा पैसा कोठून आला. मिळालेल्या पैशावर त्यांनी कोणताही कर भरलेला नाही. आयटी रिटर्न फाईल केलेले नाहीत. आम्ही कोणतेही राजकारण करत नाही. देवस्थानच्या नावाचा कोणी गैरफायदा घेत असेल, तर ते सहन करणार नाही. म्हणून हे पाऊल उचलले आहे. काटदरे यांना चूक कबूल करण्याची संधी दिली होती. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.’

देवी करंजेश्‍वरी देवस्थानच्या व्यवस्थापन समितीने पुजाऱ्याविरुद्ध आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार दिली आहे. आम्ही वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन चौकशी करत आहोत. पुजाऱ्याने देणग्या स्वीकारल्या किंवा नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल.
- देवेंद्र पोळ, 

पोलिस निरीक्षक, चिपळूण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा फेक फोटो व्हायरल; स्वतःच सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT