कोकण

नेत्रावती, मत्स्यगंधा या गाड्यांना संगमेश्वरात हवा थांबा

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - नेत्रावती, मत्स्यगंधा या गाड्यांना संगमेश्‍वर स्थानकात थांबा मिळावा, असा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्याचा निर्णय खासदार विनायक राऊत, कोकण रेल्वे अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त आणि रेल्वेस्थानकांवरील सुविधा यावर चर्चा करण्यासाठी रत्नागिरीत बैठक झाली. त्यात आमदार राजन साळवी यांनी राजापूर स्थानकावर सुविधा मिळाव्यात यासाठी विशेष मुद्दे उपस्थित केले. त्यावर तोडगा काढण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले. या बैठकीला रेल्वेचे अध्यक्ष गुप्ता, विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेंडये, नंदू तेलंग यांच्यासह अन्य उपस्थित होते. 

राजापूर स्थानकावरील प्लॅटफार्मवर एक्‍सलेटर बसवावा अशी मागणी केली. मात्र त्याला एक कोटीहून अधिक खर्च येऊ शकतो. त्याऐवजी राजापूर स्थानकावर लिफ्ट उभारण्याचा निर्णय झाला आहे. १० माणसे एकावेळी जातील अशी ही लिफ्ट असेल. त्याचा खर्चही लाखात आहे. 

हे काम येत्या काही दिवसांत सुरू होणार असून पाच ते सहा महिन्यांत लिफ्ट सुरू होणार आहे. फलाटावर रुंदीकरण करण्याचा विचार नाही. त्यासाठी एक कोटी रुपये खर्च आहे. त्याऐवजी सपाटीकरण करून स्थानकावर टाईल्स बसवण्यात येणार आहे. निवसर येथे फूटब्रिजची गरज आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असे कोकण रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

राजापूर स्थानकाची उंची वाढवा
राजापूर स्थानकाची उंची वाढवावी, अशी मागणी केली. मात्र रेल्वे प्रशासनाने उंची वाढवण्यासाठी निधीची गरज आहे. आमदार किंवा खासदार फंडातून निधी मिळाला तर उंची वाढवण्याचा निर्णय प्रशासन घेईल. त्यासाठी आम्हाला पत्र द्या, अशी सूचना आमदार साळवी यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT