Konkan Railway Route esakal
कोकण

Konkan Railway : कोकण रेल्वे मार्गावरील 'त्या' सेवेबाबतचं वृत्त खोटं? रेल्वे प्रशासनाचा महत्वाचा खुलासा

'कोकण रेल्वे मार्गावर पनवेल-चिपळूण रेल्वेची डेमू सेवा ४ सप्टेंबरपासून सुरू होणार हे वृत्त चुकीचं'

सकाळ डिजिटल टीम

याही वर्षी 13 सप्टेंबरपासून चिपळूणसाठी दिवा ते चिपळूण अशी मेमू स्पेशल ट्रेन सोडली जाणार आहे.

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर (Konkan Railway Route) पनवेल-चिपळूण रेल्वेची डेमू (Panvel-Chiplun Railway) अशी कोणतीही गाडी 4 सप्टेंबरपासून गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेली नाही. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असं आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आलं आहे.

या संदर्भातील आधी दिलेलं वृत्त चुकीचं आहे. कोकण रेल्वे मार्गावर पुढील महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवासाठी रेल्वेकडून चिपळूणपर्यंतच्या प्रवाशांसाठी दिवा ते चिपळूण अशी (01155) स्वतंत्र मेमू ट्रेन (Memu Train) सोडण्यात येणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावर पनवेल-चिपळूण रेल्वेची डेमू सेवा ४ सप्टेंबरपासून सुरू होणार हे वृत्त चुकीचं असून पुढील महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवासाठी रेल्वेकडून चिपळूणपर्यंतच्या प्रवाशांसाठी दिवा ते चिपळूण अशी (01155) अशी स्वतंत्र मेमू ट्रेन सोडण्यात आली आहे.

13 सप्टेंबरपासून चिपळूणसाठी मेमू स्पेशल ट्रेन सोडली जाणार

गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्यांना गर्दी होत असल्यामुळे मुंबईहून चिपळूणपर्यंत येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मागील काही वर्षांपासून चिपळूणसाठी स्वतंत्र लोकल श्रेणीतील रेल्वे गाडी सोडण्यात येते. याही वर्षी 13 सप्टेंबरपासून चिपळूणसाठी दिवा ते चिपळूण अशी मेमू स्पेशल ट्रेन सोडली जाणार आहे. दिवा ते चिपळूण मेमू गाडीची दिवा जंक्शन येथून सुटण्याची वेळ सायंकाळी 7:45 अशी होती.

'मेमू स्पेशल ट्रेनच्या वेळेत कोणताही बदल नाही'

मात्र, आता सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी (01155) दिवा जंक्शन येथून दहा मिनिटे आधी म्हणजे सायंकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी सुटणार आहे. तसेच मेमू स्पेशल ट्रेनच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. गणेशोत्सवात दिवा ते चिपळूण दरम्यान धावणाऱ्या मेमू स्पेशल ट्रेनच्या वेळेत झालेल्या या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असं आवाहनही विभागाकडून करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT