Depot chief Sagar Gade charged with provocative statement sakal
कोकण

प्रक्षोभक वक्तव्याप्रकरणी आगारप्रमुख सागर गाडे यांच्यावर गुन्हा

१५ दिवस या विरोधात पाठपुरावा करणाऱ्या संगमेश्‍वर तालुका भाजपच्या लढ्याला अखेर यश

सकाळ वृत्तसेवा

देवरूख : सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभक वक्तव्य करून सामाजिक शांतता भंग केल्याप्रकरणी देवरूख एस.टी. आगारप्रमुख सागर गाडे यांच्यावर अखेर आज १६ दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे गेले १५ दिवस या विरोधात पाठपुरावा करणाऱ्या संगमेश्‍वर तालुका भाजपच्या लढ्याला अखेर यश आले.

देवरूख आगाराचे प्रमुख सागर गाडे यांनी १६ दिवसांपूर्वी सार्वजनिक ठिकाणी विविध समाजाविषयी आणि महिलांविषयी अश्‍लील व प्रक्षोभक टिप्पणी केली होती. याचा सबळ पुरावा हाती मिळताच संगमेश्‍वर तालुका भाजपच्या वतीने या विरोधात देवरूख पोलिस ठाण्यात निवेदन देत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. त्या आधी देवरूखातील सर्वपक्षीय महिलांनीही असेच निवेदन देत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती; मात्र त्याला १५ दिवस उलटून गेले तरी कोणतीही कारवाई झाली नव्हती. अखेर आज सकाळी संगमेश्‍वर तालुका भाजपच्या वतीने देवरूख पोलिस ठाण्यावर धडक देण्यात आली.

यानंतर चर्चेअंती काहीच निष्पन्न होत नसल्याने अखेर महिलांसह पुरुषांनी भर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. याला यश येत पोलिस निरीक्षक बाळकृष्ण पाटील यांनी आधी तक्रार दाखल करा मग गुन्हा दाखल करतो, असे सांगितले. यानंतर भाजप संगमेश्‍वर तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी रितसर तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर सागर गाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे देवरूख पोलिसांनी सांगितले. गुन्हा दाखल झाल्याचे स्पष्ट होताच भाजप कार्यकर्ते माघारी परतले. यामुळे आता भाजपच्या लढ्याला यश आले असून गाडेंवर महामंडळानेही रितसर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Rate Cut: डिसेंबरमध्ये तुमचा EMI कमी होणार? आरबीआय गव्हर्नर मोठा निर्णय घेण्याची शक्यता

Medical Academy : वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या ॲकॅडमीचा पैसे देण्यास टाळाटाळ, विद्यार्थी गेला ग्राहक न्यायालयात अन् १३ लाख रूपये देण्यास पाडलं भाग...

Latest Marathi News Live Update : नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला वेग; 6 नोव्हेंबरला प्रकाशित होणार प्रारूप मतदार यादी

Karnataka Education : दहावी, बारावी उत्तीर्णतेसाठी आता 33 टक्के गुणांची मर्यादा; राज्यातील शिक्षण क्षेत्रात मोठा बदल, कधीपासून नियम लागू होणार?

Thar Accident : भरधाव थारची सख्ख्या बहिणींना धडक; एकीचा मृत्यू, दुसरी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT