कोकण

ग्रामीण जीवनशैलीचा रोमांचक अनुभव देणारा देवाचा डोंगर 

सचिन माळी

मंडणगड - समुद्रसपाटीपासून साडेतीन हजार फुटांवर वसलेल्या देवाचा डोंगर येथील नैसर्गिक वातावरणातील ग्रामीण संस्कृती मनाला स्पर्शून जाणारी आहे. डोंगरवासीयांनी प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करीत आपले एक वेगळं विश्व तयार केले आहे. ग्रामीण जीवनशैलीचा रोमांचक अनुभव म्हणजे देवाचा डोंगर. 

चार तालुके जोडणाऱ्या या डोंगरावर राहणाऱ्या माणसांचे हृदयही डोंगराएवढे उंच आणि विशाल आहे. देवाचा डोंगर येथे चार वाड्या आहेत. यात धनगर समाजाची १७५ घरे विसावली आहेत. मात्र त्यांचे चार तालुक्‍यांत विभाजन झाले आहे. मंडणगडमध्ये भोळवली देवाचा डोंगर, दापोलीत जामगे देवाचा डोंगर, महाड, ताम्हाणे, देवाचा डोंगर, खेड, तुळशी, देवाचा डोंगर अशा वाड्या ओळखल्या जातात. परंतु वेगवेगळ्या तालुक्‍यात विभागले असले तरी येथील ग्रामस्थ गुण्यागोविंदाने नांदतात. निसर्गाचे देणे लाभलेला हा परिसर पावसाळ्यात डोळ्यांचे पारणे फेडतो. अंगाला भिडणारा गार वारा, सर्वत्र पसरलेली धुक्‍याची चादर, धबधबे, सुरावटी आळवणारे पक्षी आणि चौफेर दिसणारे विहंगम दृश्‍य मनाला भुरळ घालते. 

डोंगरावर फक्त घरेच उभारली नसून उपजीविकेची  साधने तयार केली आहेत. सुमारे तीन हजारांचे पशुधन असून भात शेती तयार केली आहे. डोंगरावर तीन मंदिरे आहेत. यात सर्वांत उंच ठिकाणी स्वयंभू शिवशंकराचे मंदिर असून वाडीतून विठ्ठल-रखुमाई, साईबाबा यांची श्रद्धास्थाने मंदिरे आहेत. येथे एकही दुकान नाही. त्यामुळे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंचा साठा करून ठेवावा लागतो. दळणवळणाची साधने नाहीत. त्यामुळे बाह्य जगाशी फारसा संबंध नाही. आठवीपर्यंत शाळा असून वैद्यकीय सुविधा मात्र अजूनही पोचलेल्या नाहीत. जागृत देवस्थान असल्याने महाशिवरात्रीला ५० ते ६० हजार भक्तगण येतात.

येथील विविध समस्या मार्गी लागत असून त्यासाठी उपोषणे करावी लागली. रस्ता, विविध आवश्‍यक योजना आता मिळू लागल्या आहेत. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आता चांगले सहकार्य मिळते. गेल्या वर्षांपासून टॅंकरमुक्त होण्याकडे वाटचाल सुरू आहे.
- काशिनाथ झोरे,
सामाजिक कार्यकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT