- अरविंद वाळके,आंबा बागायतदार, कुणकेश्‍वर वाळकेवाडी. sakal
कोकण

‘देवगड हापूस’ आता प्लास्टिक क्रेटमधून

पॅकिंग खर्चातही बचत होत असल्याचा बागायतदारांचा अनुभव आहे.

संतोष कुळकर्णी

देवगड: जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारा देवगड हापूस आता प्लास्टिक क्रेटमधून बाजारात जात आहे. याद्वारे आंबा सुरक्षित जाण्याबरोबरच हवा लागत असल्याने फळामध्ये साक्या होण्याचे प्रमाण कमी होईल. पॅकिंग खर्चातही बचत होत असल्याचा बागायतदारांचा अनुभव आहे.

कोकणातील हापूस वाशी बाजारात पाठवताना विविध प्रकारचे पॅकिंग साहित्य वापरले जात असे. सुरुवातीला करंड (लाकडी बांबूपासून बनवलेले) होते. आंबा नाजूक असल्याने वाहतुकीमध्ये सुरक्षितता येण्यासाठी लोखंडी ट्रंकही वापरली जात होती. त्यावेळी काही प्रमाणात लाकडी खोके वापरले जात होते; मात्र ते हाताळणीसाठी वजनदार पडतात. ट्रंकमधून आंबा बाजारात गेल्यावर रिकाम्या ट्रंका माघारी आणल्या जातात. त्या परत आणण्याचे किरकोळ भाडे आकारले जाते; मात्र ट्रंकाची एकूणच किंमत आणि काही प्रमाणात ट्रंका गहाळ होत असल्याचे चित्र होते. त्यानंतर पॅकिंगसाठी पुठ्ठा बॉक्स वापरात आले. एकदा पाठवलेले बॉक्स परत आणला जात

नसल्याने आंबा पार्सलचे एकेरी भाडे बागायतदारांना परवडते; मात्र ट्रकमध्ये आंबा भरल्यानंतर एकावर एक पार्सल भरल्यावर काही प्रमाणात बॉक्स दबतात. त्याने आंब्याला धोका पोहोचण्याचा संभव असतो. आता पॅकिंगसाठी प्लॉस्टिक क्रेट्चा वापर होत आहे. मोठे बागायतदार चांगल्या दर्जाचे क्रेट वापरत असल्याने पॅकिंगवेळी अडचणी भासत नाहीत. क्रेटमध्ये आंबा सुरक्षित भरला जातो. ट्रकमध्ये एकावर एक क्रेट ठेवल्याने फळांना नुकसान पोहोचत नाही. क्रेट चारही बाजूने हवेशीर असल्याने आतील फळांचे तापमान वाढत नाही. अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे आंब्यामध्ये होणारे साक्याचे प्रमाण कमी होऊ शकेल, असा अंदाज आहे.

बाजारात दोन डझनपासून क्रेट

विक्रीस आहेत. लाकडी खोक्याप्रमाणे आंबा क्रेट मिळत असल्याने बागायतदारांकडून त्याला पसंती मिळते. चांगल्या दर्जाचे क्रेट वापरले जात असल्याने आंब्याची सुरक्षितता

वाढली आहे. यातून आंबा हाताळणी करणे सोपे झाले आहे. परिमाणी

लोखंडी ट्रंकची जागा क्रेटने घेतल्याचे चित्र आहे. आंबा बाजारात पाठवण्यासाठी प्लास्टिक क्रेटचा वापर होत आहे. ट्रंकांची वाढलेली किंमत पाहता त्याच्या निम्म्या किमतीमध्ये क्रेट उपलब्ध होतात. वाहतुकीमध्ये ट्रंकांची होणारी मोडतोड, डागडुजीसाठी आणि रंगरंगोटीसाठी होणारा खर्च विचारात घेता क्रेट परवडतात. एका क्रेटवर साधारणतः पाच हंगाम निश्‍चितच जातील. वाहतूक करताना एकावर एक क्रेट ठेवता येत असल्याने आंबा दबत नाहीत. हवा लागत असल्याने फळे सुरक्षितत राहतात. डागी फळांसाठी बॉक्स वापरले जात असले तरी निवडक आंब्याची वाहतूक क्रेटमध्ये करण्यावर भर असतो.

- अरविंद वाळके,आंबा बागायतदार, कुणकेश्‍वर वाळकेवाडी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT