कोकण

धनगर समाजाचा 9 ला मोर्चा

सकाळवृत्तसेवा

वैभववाडी - धनगर समाजाला एस.टी. आरक्षण न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील धनगर समाजाच्यावतीने येत्या मंगळवारी (ता. 9) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. गजनृत्यातुन समाजबांधव शासनाचे लक्ष वेधणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा धनगर समाज एस. टी. आरक्षण कृती समितीची सभा ओरोस येथे जिल्हा मुख्य संघटक सुरेश झोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करुन तातडीने एस.टी. आरक्षण लागू करण्याचे आश्वासन भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 च्या निवडणुकीत दिले होते. आश्‍वासन दिल्यानंतर चार वर्षाचा कालावधी लोटला तरी आजमितीस सरकार आरक्षण द्यायला तयार होत नाही. त्यामुळेच आरक्षण मागणीसाठी 9 ऑक्‍टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे संपुर्ण मोर्चात गजनृत्य सादर करून समाजबांधव शासनाचे लक्ष वेधणार आहे.

मोर्चाच्या पार्श्वभुमीवर सभेत तालुकानिहाय एक जिल्हा संघटकाची नेमणूक करण्यात आली. त्यानुसार सूर्यकांत बोडके (वैभववाडी), कानू शेळके (कुडाळ), संतोष पटकारे (दोडामार्ग), विलास जंगले (सावंतवाडी), संतोष साळसकर (देवगड), सुनिल वरक (मालवण), बाबू हुंबे (कणकवली) व रामा लांबर (वेंगुर्ले) आदींची जिल्हा संघटक निवड करण्यात आली आहे. तर तालुका संघटक म्हणून प्रत्येक तालुक्‍यासाठी दोन संघटक निवडण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

SCROLL FOR NEXT