Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Women’s T20 World Cup 2024: स्कॉटलँड आणि श्रीलंका महिला संघांनी यावर्षी होणाऱ्या महिला टी20 वर्ल्ड कपसाठी पात्रता मिळवली आहे.
Scotland - Sri Lanka | Women's T20 World Cup 2024
Scotland - Sri Lanka | Women's T20 World Cup 2024Sakal

Women’s T20 World Cup 2024: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने रविवारी यावर्षी होणाऱ्या महिला टी20 वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाची घोषणा केली. 10 महिला संघात होणाऱ्या या स्पर्धेसाठी 8 संघांनी थेट पात्रता मिळवली होती. पण दोन संघ क्वालिफायर्समधून निश्चित होणार होते.

अखेर रविवारीच अखेरचे दोन संघही निश्चित झाले आहेत. स्कॉटलँड आणि श्रीलंका या महिला संघांनी क्वालिफायर स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवत टी20 वर्ल्ड कपची पात्रता मिळवली आहे.

त्यामुळे आता हे दोन्ही संघ ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश या महिला संघाविरुद्ध 3 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या मुख्य टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसतील.

Scotland - Sri Lanka | Women's T20 World Cup 2024
ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

स्कॉटलँड पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये

रविवारी महिला टी20 वर्ल्ड कपच्या क्वालिफायर्समधील उपांत्य फेरीत स्कॉटलँडने आयर्लंड महिला संघाचा 8 विकेट्सने पराभूत केले. त्यामुळे स्कॉटलँड पहिल्यांदाच महिला टी20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरले. यापूर्वी स्कॉटलँडने कधीही महिली टी20 वर्ल्ड कप खेळलेला नाही.

उपांत्य सामन्यात आयर्लंडने दिलेल्या 111 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग स्कॉटलँडने 16.2 षटकात 2 विकेट्स गमावत 112 धावा करून सहज पूर्ण केला. स्कॉटलँडकडून मेगन मॅककॉलने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली, तर कर्णधार कॅथरिन ब्राइसने नाबाद 35 धावांची खेळी केली. आयर्लंडकडून दोन्ही विकेट्स एर्लिन केलीने घेतल्या.

तत्पुर्वी, आयर्लंडकडून लीह पॉलने सर्वाधिक 45 धावा केल्या, तर केलीने 35 धावा केल्या. बाकी कोणाला खास काही करता आले नाही, त्यामुळे आयर्लंडला 20 षटकात 9 बाद 110 धावाच करता आल्या. स्कॉटलँडकडून ब्राइसने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तसेच रेचल स्लाटरने 3 विकेट्स घेतल्या, तर अब्ताह मकसूद हिने 1 विकेट घेतली.

श्रीलंकेनेही मिळवली पात्रता

दरम्यान,महिला टी20 वर्ल्ड कपच्या क्वालिफायर्समधील उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेच्या महिला संघाने संयुक्त अरब अमिराती (UAE) महिला संघाला 15 धावांनी पराभूत करत टी20 वर्ल्ड कपच्या मुख्य स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.

उपांत्य सामन्यात श्रीलंकेने युएईसमोर 150 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना युएई संघाला 20 षटकात 7 बाद 134 धावाच करता आल्या. युएईकडून कर्णधार ईशा ओझाने सर्वाधिक 66 धावांची खेळी केली.

मात्र अन्य कोणालाही खास काही करता आले नाही. श्रीलंकेकडून कर्णधार चामरी अटापट्टू हिने 2 विकेट्स घेतल्या, तर इनोशी प्रियदर्शनी, सुगंधिका कुमारी आणि उदेशिका प्रबोधनी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेकडून विश्मी गुणरत्ने हिने सर्वाधिक 45 धावांची खेळी केली. तसेच अटापट्टूने 21 आणि हर्षिता मादवी हिने 24 धावांची खेळी केली. अन्य फलंदाजांनीही छोटेखानी खेळी करत योगदान दिले. त्यामुळे श्रीलंकेने 20 षटकात 6 बाद 149 धावा केल्या होत्या.

युएईकडून वैष्णवी महेश आणि ईशा ओझा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर काविशा इगोडागे हिने 1 विकेट घेतली.

Scotland - Sri Lanka | Women's T20 World Cup 2024
T20 Cricket World Cup : अमेरिकेच्या विश्वकरंडक संघात मुंबईचे नेत्रावलकर, हरमीत सिंग

बांगलादेशमध्ये होणार टी20 वर्ल्ड कप

महिला टी20 वर्ल्ड कप 3 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 2024 दरम्यान बांगलादेशमध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेतील उपांत्य सामने 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी अनुक्रमे सिल्हेट आणि ढाका येथे होतील. तसेच अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी ढाका येथे होईल.

या स्पर्धेतील साखळी फेरीसाठी 10 संघांचे दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि स्कॉटलँड/श्रीलंका हे संघ आहेत, तर ब गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज बांगलादेश आणि स्कॉटलँड/श्रीलंका हे संघ आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com