Dirty Dam becomes the spot of drinkers 
कोकण

उन्हेरे धरण बनले मद्दपींचा अड्डा, परिसरात अस्वच्छता

अमित गवळी

पाली : सध्या अनेक ठिकाणची निसर्गरम्य धरणे व फेसाळणारे धबधबे हे पर्यटकांच्या मौजमजेची ठिकाणे झाली आहेत.मात्र काही ठिकाणी मद्दयपी पर्यटकांद्वारे परिसर अस्वच्छ केला जातो. सुधागड तालुक्यातील उन्हेरे धरणावर देखिल अशाच प्रकारे मद्यपींनी अस्वच्छता व प्रदुषण करुन ठेवले आहे.

निसर्गाने नटलेले उन्हेरे धरणावर सुट्टी वगळता फारसी पर्यटकांची गर्दी नसते. याच एकांतामुळे अनेक मद्दपींना येथे दारु पिण्याची नामी संधी उपलब्ध होते. मात्र हे तळीराम दारु रिचविल्यावर अापल्या सोबत अाणलेल्या बियर, दारुच्या बाटल्या, टिन तसेच वेफर्स अादींची प्लॅस्टिक अावरणे व प्लॅस्टिकचे ग्लास परिसरात तसेच टाकून जातात. त्यामुळे उन्हेरे धरण परिसर विद्रुप होऊन तेथे पर्यावरणीय प्रदुषण होत आहे. तसेच मद्यधुंद अवस्थेत असलेल्या लोकांचा त्रास इतर पर्यटकांना देखिल होण्याची शक्यता अाहे. याबाबत पोलिसांनी येथे गस्त घातल्यास मद्दयपींना अावर बसु शकतो.

''पर्यटक व निसर्गप्रेमींनी या ठिकाणी येऊन निसर्गाचा मनसोक्त अानंद लुटावा. मात्र मद्दयपींसाठी हि जागा नाही. प्रत्येकाने पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण केले पाहिजे. असे परिसर स्वच्छ ठेवणे अापलीच जबाबदारी आहे.''

अभिजीत देशमुख, पर्यटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Live Streaming: भारत-श्रीलंका कसोटी मालिकेचे काउंटडाऊन सुरू! कुठे पाहता येणार सामने लाईव्ह? पाहा संपूर्ण डिटेल्स

Koyna Dam : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला; पाण्याची आवक घटली, 92.49 टीएमसी साठा

Kia Sorento: फॉर्च्यूनरला टक्कर! कियाची पहिली हायब्रिड SUV 'Sorento' लाँचसाठी तयार; प्री-बुकिंग सुरू!

Marathi Live Updates News: राज ठाकरे यांनी घेतले डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

IND vs SL, Test: भारताची चिंता वाढली! ७ ऑगस्टच्या सामन्याबाबत समोर आली महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT